बीड : जिल्हा रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्र शासनाकडून नवी दिल्ली येथे पारितोषिकासाठी बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
अभियानांतर्गत गरोदर मातांची तपासणी, खाजगी डॉक्टरांची मदत, सोनोग्राफी सुविधा, ५० प्राथमिक केंद्रांतर्गत जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व उपकेंद्राच्या माध्यमातून तीन हजारांपेक्षा अधिक गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी डॉक्टरांना देखील सहभागी करुन घेतले जाते. योजना राबवत असताना सुदृढ बालक जन्माला यावे यासाठी मोफत सोनोग्राफी देखील करण्यता आली. योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येत्या २९ जून रोजी सायं. ५ वाजता दिल्ली येथे डॉ. अशोक थोरात यांचा पारितोषिक देऊन सत्कार होणार आहे.