लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहरात धनदांडग्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन मागील अनेक वर्षांपासून बीड नगर पालिकेचे फुकटात पाणी वापरले. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला. पाणीपुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेत पथक नियुक्त करून कारवाईला सुरूवात केली आहे. यामुळे फुकटात पाणी वापरणाºयांचे धाबे दणाणले आहेत. मंगळवारी दिवसभर कारवाई सुरूच होती.बीड शहरात गल्लीबोळात काही धनदांडग्यांनी लोकप्रतिनिधी व तत्कालीन अधिकाºयांना हाताशी धरुन मुख्य जलवाहिनीला नळ जोडणी घेतल्या. अनेकांच्या घरी दोन ते तीन नळ जोडणी आढळून येतात. त्यामुळे काही भागात सर्वसामान्यांना थोडेसे पाणी मिळते. हाच धागा पकडून लोकमतने १७ नोव्हेंबर रोजी ‘बीड शहरात तीन हजार अवैध नळ कनेक्शन’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. परंतु पालिकेने दुर्लक्ष केले. त्यानंतर ७ एप्रिल रोजी ‘अनधिकृत नळ जोडणीला अभय’ असे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पालिका खडबडून जागी झाली आणि कारवाईसाठी तात्काळ पथक नियूक्त केले.परंतु पथकाने कारवाईस सुरूवात केली नाही. त्यानंतर पुन्हा १७ एप्रिल रोजी ‘अनधिकृृत नळ जोडणी तोडण्यासाठी पथक नियुक्त’ असे वृत्त प्रकाशित केले. यामध्ये नियुक्त केलेल्या पथकाकडून एकही कारवाई झाली नसल्याचे समोर आणले. त्यानंतर मात्र पाणीपुरवठा विभाग खडबडून जागा झाला आणि मंगळवारी सकाळपासूनच कारवाईला सुरूवात केली.बीड शहरातील गांधीनगर व इतर भागात दिवसभर कारवाया केल्या जात होत्या.सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरूच होते. मिळालेल्या माहितीनूसार जवळपास ३० नळ जोडण्या तोडल्याचे सांगण्यात आले. या सर्व कारवायांचा आढावा अभियंता राहुल टाळके, निखिल नवले, श्रद्धा गर्जे हे घेत होते.कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणीपालिकेने पहिल्या टप्प्यात सलग चार दिवस कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिले आहेत. पहिल्याच दिवशी जोरात कारवाया केल्या.यामध्ये पथकाने सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.दुजाभाव करू नयेअनेकवेळा पालिकेकडून कारवाईत दुजाभाव केला गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामध्येही धनदांडग्यांना पाठिशी घालून सर्वसामान्यांवर कारवाई केली जाते, असे झाल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतो. हे टाळण्यासाठी कारवाईत दुजाभाव न करता, समान कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करू नयेबीडमध्ये प्रत्येक चांगल्या कामात राजकीय व्यक्ती हस्तक्षेप करून अडथळा आणतात. या कारवाई मोहिमेतही हे नाकारता येत नाही.उन्हाळ्याच्या दिवस असल्याने काही लोकांना कमी पाणी येत असल्याने धावपळ करावी लागते. त्यामुळे ही कारवाई मोहीम समाधानकारक आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप न करता कारवाईस सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे.
बीडमध्ये फुकटचंबू पाणीचोरांवर अखेर कारवाई सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:02 AM
बीड शहरात धनदांडग्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन मागील अनेक वर्षांपासून बीड नगर पालिकेचे फुकटात पाणी वापरले. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला. पाणीपुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेत पथक नियुक्त करून कारवाईला सुरूवात केली आहे. यामुळे फुकटात पाणी वापरणाºयांचे धाबे दणाणले आहेत. मंगळवारी दिवसभर कारवाई सुरूच होती.
ठळक मुद्देपथक लागले कामाला : अनधिकृत नळ कनेक्शन असणाऱ्यांचे धाबे दणाणले