शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
"यांच्या स्वभावातच कोणाची..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
3
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
4
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
5
क्रिकेटच्या मैदानात 'बुद्धिबळातील चाल': टॉम लॅथमच्या विकेटसाठी R Ashwin नं असं विणलं जाळं (VIDEO)
6
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
7
डॉलरची दादागिरी संपुष्टात येणार? भारत-रशिया-चीनने बनवला प्‍लॅन, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ताकदीला आव्हान
8
Waaree Energies IPO allotment status: Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
9
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
10
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
11
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
12
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
13
का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित
14
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
15
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
16
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
17
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
18
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
19
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
20
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल

ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांना अटक

By सोमनाथ खताळ | Published: June 07, 2024 7:37 PM

पुण्यातून घेतले ताब्यात : बीड जिल्ह्यात नऊ गुन्हे दाखल

बीड : ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी घेतल्या. नंतर त्या परत न दिल्याने ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल होते. याच अनुषंगाने बीडपोलिसांनी सुरेश कुटे यांना शुक्रवारी पहाटे पुण्यातील हिंजवडी भागातून अटक केली आहे. त्यांना सध्या माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

बीडसह छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, आदी जिल्ह्यांत ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या ५२ शाखा आहेत. यामध्ये सहा लाखांपेक्षा अधिक ग्राहक असून, कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये कुटे ग्रुपच्या तिरूमला ग्रुपची आयकर विभागाकडून तपासणी झाली. त्यानंतर ठेवीदारांनी घाबरून ज्ञानराधामधील ठेवी काढून घेतल्या; परंतु मल्टिस्टेटमधील पैसे संपल्याने या ठेवी परत देण्यात कुटे असमर्थ ठरले. पैसे परत देण्यासह सुरेश कुटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठेवीदारांनी आंदोलने केली; परंतु तरीही काहीच कारवाई झाली नव्हती. अखेर ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर गुन्हे दाखलचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले आहेत.

दरम्यान, गुन्हे दाखल झाल्यानंतरही कुटे यांच्याकडून सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून परदेशातून पैसे येत असल्याचे आश्वासन दिले जात होते. परंतु प्रत्यक्षात काहीच प्रगती दिसत नसल्याने ठेवीदार आक्रमक होत होते. पोलिसांकडूनही अनेकदा या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते; परंतु ठेवीदारांचा वाढता रोष पाहून त्यांनी शुक्रवारी पहाटे सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना पुण्यातून ताब्यात घेतले. दुपारी तीन वाजता त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. प्राथमिक चौकशी करून त्यांना माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दोन दिवसांत पैसे देणार : कुटे

सुरेश कुटे यांना पोलिस अधीक्षक कार्यालयातून माजलगावकडे नेत असताना त्यांना ठेवीदारांनी आमच्या पैशांचे काय? असा सवाल केला. यावर ‘घाबरू नका, मी दोन दिवसांत तुमचे सर्वांचे पैसे देतो, असे सुरेश कुटे यांनी ठेवीदारांना सांगितले. यावेळी ठेवीदारांची माेठ्या संख्येने उपस्थिती होती.

सुरेश कुटेसह एका संचालकाला अटक केली आहे. त्यांना सध्या माजलगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दिले आहे. पोलिस कोठडी आणि इतर तपास केला जाईल. अर्चना कुटे यांना अटक केलेली नाही - नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी