अनिल भंडारीलोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है’ या ओळी सार्थ ठरवित ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणा-या येथील करण सूर्यकांत महाजन याने भारतीय हवाईदलात ‘फ्लार्इंग आॅफिसर’ बनण्याचा मान मिळविला आहे. भारतीय सैन्य दलात बीड जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी देशसेवेसाठी यशस्वी कामगिरी केल्याची नोंद आहे. आता हवाई दलातही करणसारख्या उमद्या तरुणांनी पाय रोवले आहेत.
येथील चष्म्याचे व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत महाजन यांचा मुलगा करण याने दहावीपर्यंत येथील सेन्ट अॅन्स स्कूलमध्ये त्यानंतर बारावीपर्यंत राजस्थानातील कोटा येथे शिक्षण घेतले. या दोन्ही ठिकाणी तो स्टुडंटस् आॅफ द इअर म्हणून बहुमान मिळविला. नंतर हिमाचल प्रदेशातील मंडी येथील आयआयटीमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरचे २०१७ मध्ये शिक्षण पूर्ण केले. येथे दुस-या वर्षात असतानाच वरिष्ठ वर्गातील मित्राचे व्हिजन पाहून आपणही भारतीय सैन्य दलात काही करुन दाखविले पाहिजे अशी आवड निर्माण झाली.
सेंट्रल डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) परीक्षेची तयारी सुरु केली. केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर होणाºया या परीक्षेची २०१६ पासून करणने तयारी सुरु कोली. फेब्रवारी २०१७ मध्ये परीक्षा दिली. सीडीएसच्या लेखी परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर जुलैमध्ये एसएसबीचा टप्पा पार करावा लागतो. पाच दिवस मानसशास्त्र, समूह चर्चा, वैयक्तिक मुलाखत, शारिरीक तंदुरुस्ती या मुद्यांवर ही परीक्षा असते. आॅफिसर लाइक क्वालिटी या कसोटीवर उमेदवाराची खडतर परीक्षा घेतली जाते.
जुलैमध्ये झालेल्या एसएसबीमध्ये पहिल्याच प्रयत्नात करण यशस्वी झाला.सीडीएससाठी दोन लाख उमेदवार तर एसएसबीसाठी ८ हजार उमेदवार पात्र होते. यातून चाळणी होऊन करण पात्र ठरला. सीडीएस आणि एसएसबीमध्ये करणने आॅल इंडिया चौथी रॅँक प्राप्त केली. केंद्रिय लोकसेवा आयोग व भारतीय हवाई दलाच्या वतीने ही एसएसबी टेस्ट होते.
‘आयआयटी म्हणून काय झाले, नेशन स्पीरिट महत्वाचे’आयआयटी केले आहे. मग ते क्षेत्र सोडून इकडे कसा काय? असा प्रश्न विचारण्यात आला. करणनेदेखील तितकेच समर्पक उत्तर दिले. आयआयटी असलो म्हणून काय झाले? नेशन स्पीरिट महत्वाचे आहे. तांत्रिक बाजू आणि कौशल्याचा संगम साधला तर त्याचा फायदा या क्षेत्रातून होऊ शकतो. असे उत्तर करणने देताना त्याच्यामध्ये जाणवणारा आत्मविश्वास टर्निंग पाइन्ट ठरला. त्याला फ्लार्इंग आॅफिसर रॅँक मिळाली. आता पुढील दीड वर्ष तो हैद्राबाद येथील एअर फोर्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण व त्यानंतर हवाई दलातील पायलट म्हणून करण देशसेवेसाठी सज्ज होणार आहे.आयआयटीचे शिक्षण घेतानाच करणने एअरफोर्समध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करुन सल्ला विचारला. प्रायव्हेट जॉब केला तर बºयापैकी पॅकेज मिळेल असे त्याला मी म्हणालो, परंतु , काही गोष्टी मुलांकडून शिकायला मिळतात. ‘पुत्र व्हावा ऐवा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ अशा कर्तृत्वामुळे आयुष्यातील उणिवा विसरुन आणखी दहा वर्ष बळ वाढलं अशी भावना करणचे वडील सूर्यकांत महाजन यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
देशासाठी काहीतरी करण्याची जिद्दपगार, ड्यूटी असा रुटीन जॉब मला करायचा नाही. मला असे काहीतरी करायचे आहे की, ज्यामुळे ५०- १०० जण इन्स्पायर होतील. मनाशी निश्चय केला, घरच्या लोकांनी संमती दिली आणि अभ्यास करून परीक्षांना सामोरे गेलो. यशही मिळाले. देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द बाळगली आहे.- करण महाजन,फ्लाइंग आॅफीसर, एअरफोर्स.