गेवराई (बीड) : बीड आगारातून कोपरगावकडे निघालेल्या बसला टायर पंम्चर झाल्याने गेवराईजवळ अपघात झाला. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळी बीड आगारामधून 'बीड-कोपरगाव' ही बस ( एम.एच.14 बी.टी .3469 ) निघाली. सकाळी ७ च्या सुमारास बस गेवराई येथील महावितरणाच्या उपकेंद्राजवळ आली असता तिचा एक टायर अचानक पंम्चर झाला.यामुळे बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात गेली. यावेळी बसमध्ये २८ प्रवासी होते. सुदैवाने एका प्रवास्याला किरकोळ इजा सोडता सर्व प्रवासी सुखरूप आहेत. जखमी प्रवास्याचे नाव शेख खाजा (बीड) असे असून त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याची माहिती गेवराई येथील आगार प्रमुख संदिप साळुंके यांनी दिली.