शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

बीड लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बीडमध्ये मुंडे भगिनींची सरशी; भाजपच्या प्रीतम मुंडेंचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 17:38 IST

नाही चालली जातीय समीकरणे; राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे पराभूत

- सतीश जोशी 

बीड : बीड लोकसभा मतदार संघामध्ये भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा दणदणीत पराभव केला. मुंडे यांना विधानसभेच्या सहाही मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. या मतदारसंघामध्ये मतदारांनी जातीय राजकारणाला थारा दिला नसून, विकासाला आणि मोदींच्या ध्येयधोरणांना मत दिल्याचे चित्र पाहवयास मिळाले.

आष्टी विधानसभा मतदारसंघातील तीन फेऱ्यांची मतमोजणी बाकी होती. परळी, माजलगाव, केज, गेवराई आणि बीड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा प्रीतम मुंडे यांना १ लाख ७३ हजार मतांनी आघाडीवर होत्या. प्रीतम मुंडे यांना मतदारसंघात सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त मतदान झाले. परळी विधानसभा मतदारसंघात त्यांना १८ हजार ९१९ मतांची आघाडी मिळाली. माजलगावमध्ये १९ हजार ७१६, केजमध्ये २८ हजार, गेवराईत ३४ हजार ८८८, तर आष्टीमध्ये ६६ हजार ७८ मतांचे मताधिक्य मिळाले होते. आष्टी मतदारसंघातील तीन फेऱ्यांची मतमोजणी बाकी असली तरी मतदारांचा कल बघता ही आघाडी किमान १० हजाराने वाढेल असा अंदाज आहे.

या मतदारसंघात काही नेतेमंडळींनी जातीय समीकरणे मांडत मतदान फिरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मतदारांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत विकासाला मत, मोदींच्या ध्येयधोरणाला मत दिले. प्रीतम मुंडे यांना अपेक्षेप्रमाणे आष्टी मतदारसंघात थ्रीडी ने म्हणजे आ. सुरेश धस, आ. भीमराव धोंडे व माजी आ. साहेबराव दरेकर यांनी एकत्रित येत ही आघाडी जास्तीत जास्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आतापर्यंत आष्टीने नेहमीच भाजपला भरभरुन मताधिक्य दिले. यावेळी मात्र मोठ्या मनाने मताधिक्य देऊन प्रीतम मुंडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

विकासाला दिले मतबीड मतदारसंघात, राज्यात आणि देशात नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणाला विकासात्मक दृष्टीला जनतेने डोक्यावर घेतले आहे. बीड जिल्ह्यात देखील त्यांच्यामुळेच आणि जिल्ह्यातील विकास कामांमुळे मतदारांनी भाजपला मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिले. काही मंडळींनी जातीपातीचे राजकारण केले. परंतु मतदारांनी त्यास थारा दिला नाही, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

संधीचे सोने करणारमतदारांनी आम्ही केलेल्या विकास कामाला मत दिले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणला. रेल्वेमार्ग वेशीपर्यंत आणला. उर्वरित कामेही युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येतील अशी प्रतिक्रिया  विजयी उमेदवार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :beed-pcबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019