शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला; या गावात चार दिवसांपासून चुलच पेटली नाही !

By सोमनाथ खताळ | Published: June 08, 2024 6:05 PM

पंकजाताई आमच्या देव आहेत. त्यांचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याने व आता त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी असल्याचे येथील हरिदास गिते यांनी सांगितले.

कडा : आष्टी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगुळगव्हाण गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना एकगठ्ठा मतदान केले. परंतु त्यांचा पराभव झाल्याने चार दिवसांपासून गावकऱ्यांनी अन्नत्याग केला असून गावात चूलदेखील पेटली नाही.आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण या गावची लोकसंख्या १२०० च्या घरात आहे तर मतदान १००० इतके आहे. गावाने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत ९२६ एवढे मतदान केले.

विशेष म्हणजे या गावात इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला एकही मतदान झाले नाही; पण एवढी निष्ठा ठेवून मेहनत घेत गावाने एकगठ्ठा मतदान करूनदेखील निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यामुळे या गावातील महिला, पुरुष, लेकराबाळांसह चार दिवसांपासून गावातील एकाही घरात चूल पेटवली नसल्याने उपाशीपोटी बसले आहेत. ताईचे राजकारणात पुनर्वसन झाल्याशिवाय गावात चूल पेटणार नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

पंकजाताई आमच्या देव आहेत. त्यांचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याने व आता त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी असल्याचे येथील हरिदास गिते यांनी सांगितले.

आमची मुंडे कुटुंबावर निष्ठा आहे. पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव हा जिव्हारी लागला असून वरिष्ठ नेत्यांनी नियोजन करून ताईंना केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आमची मागणी असून शुक्रवारी गावातील मंदिरात लोकांनी अन्नत्याग आंदोलन केल्याचे गावचे सरपंच तुकाराम गिते यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४