Beed Lok Sabha Result 2024: राज्यातील ४७ जागांचे निकाल लागले असून आता केवळ बीड लोकसभेचा निकाल बाकी आहे. पवार गट राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे ( Bajarang Sonawane) आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांच्यात पहिल्या फेरीपासून चुरस पाहायला मिळत आहे. आता निकाल अखेरच्या फेरीवर अवलंबून असून सध्या पंकजा मुंडे यांनी री-काऊंटींगचा अर्ज दिला आहे.
बीड लोकसभा निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक होत आहे. पहिल्या फेरीपासून कधी भाजपाच्या पंकजा मुंडे तर कधी राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे पुढे अशी स्थिती होती. दोन्ही उमेदवारांनी एकमेकांची आघाडी तोडत आगेकूच केली. २७ व्या फेरी पर्यंत आघाडीवर असलेल्या पंकजा मुंडे २८ व्या फेरीत पिछाडीवर गेल्या. त्यानंतर पुढच्या सलग तीन फेऱ्यात बजरंग सोनवणे यांनी अल्प आघाडी घेत धाकधूक वाढवली. आता अखेरच्या ३२ व्या फेरीचा निकाल बाकी आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी री-काऊंटींगचा अर्ज दिल्याने निकाल लांबणीवर पडला आहे.