शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

...तर विधानसभेला आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही; पंकजा मुंडे समर्थक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 4:37 PM

निवडणूक निकाल लागल्यानंतरही हे वादंग थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र असून सोशल मीडियावरील वादग्रस्तमुळे तणाव निर्माण होत आहे.

BJP Pankaja Munde ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये धक्कादायक निकाल लागले. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. बीडची निवडणूक यंदा जातीय ध्रुवीकरणामुळे गाजली. प्रचारकाळात दोन्ही बाजूने एकमेकांवर आक्रमक टीका करण्यात आली. तसंच कार्यकर्तेही अनेकदा आमने-सामने आले होते. मात्र आता निकाल लागल्यानंतरही हे वादंग थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र असून सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे तणाव निर्माण होत आहे. पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ ओबीसी समाज बांधवांच्या वतीने डवणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी बाबरी मुंडे या पंकजा मुंडे यांच्या समर्थकाने आपल्या भाषणातून भाजपलाही इशारा दिला आहे.

"आमचा मोठा भाऊ असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशी आमचीही इच्छा आहे. मात्र आता काही लोकांकडून आरक्षणाच्या आंदोलनात जातीयवाद केला जात आहे. या सगळ्यात फक्त बघ्याची भूमिका घेणाऱ्या प्रशासनाचाही आम्ही निषेध करतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात आलं नाही तर विधानसभेला आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही," असा इशारा बाबरी मुंडे यांनी दिला आहे.

पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे बीडमध्ये गंभीर पडसाद 

आष्टी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगुळगव्हाण गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना एकगठ्ठा मतदान केले. परंतु त्यांचा पराभव झाल्याने चार दिवसांपासून गावकऱ्यांनी अन्नत्याग केला असून गावात चूलदेखील पेटली नाही. आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण या गावची लोकसंख्या १२०० च्या घरात आहे तर मतदान १००० इतके आहे. गावाने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत ९२६ एवढे मतदान केले.

दुसरीकडे, पंकजा यांचा पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे (वय -३३) याने रविवारी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती. परंतु रविवारी त्याने टोकाचे पाऊल उचलले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाbeed-pcबीड