शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

परराज्यातील धान्यावरच बीडच्या मोंढ्याची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:00 AM

मागील वर्षीचे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम पूरेशा पावसाअभावी वाया गेल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट जुलै उजाडल्यानंतरही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत गहू, ज्वारी आणि बाजरी या धान्याची परराज्यातून आवक होत आहे.

ठळक मुद्देस्थानिक आवक नगण्य : महिन्याला ४०० टन गव्हाची आवक

बीड : मागील वर्षीचे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम पूरेशा पावसाअभावी वाया गेल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट जुलै उजाडल्यानंतरही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत गहू, ज्वारी आणि बाजरी या धान्याची परराज्यातून आवक होत आहे. आठवड्याला जवळपास जवळपास ६०० टन धान्य येथील मोंढा व किराणा बाजारात येत असून त्यावरच येथील उलाढाल कमी- अधिक प्रमाणात सुरु आहे.दुष्काळजन्य स्थितीमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्यांची आवक कमी होत राहिली. पेरणी हंगामात शेती मशागतीसह बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची तजवीज करावी लागते. त्यामुळे शेतकरी अधिकचे राखून ठेवलेले धान्य विक्रीला आणतात. त्यामुळे आवकही वाढलेली असते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतू यंदा दोन्ही हंगामात निसर्गाची साथ मिळाली नाही. पहिल्या वेचणीतच कापूस संपला. तूर, हरभरा, सोयाबीन शासनाला तसेच बाजारात विकला. ज्वारी आणि बाजरीचा पेरा कमी असल्याने उत्पादनातही घट झाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना बाजारातून धान्य खरेदी करावे लागले. परिणामी सध्या बाजार समितीत स्थानिक धान्याची आवक नगण्य आहे. त्यामुळे स्टॉकिस्ट, आडत व्यापाऱ्यांनी परराज्यातील व्यापाºयांशी सौदे करुन धान्याचे व्यवहार केले. येथील मोंढ्यात ज्वारी, बाजरी आणि गहू परराज्यातून आवक होत आहे. ज्वारीची स्थानिक आवक फारशी नसल्याने कर्नाटक तसेच सोलापूर, बार्शी भागातून आयात होत आहे. कर्नाटक दुर्री ज्वारीचा २५ ते ४० रुपयांपर्यंत दर्जानुसार भाव आहे. राजस्थानच्या अलवर, दौसा, जयपूर भागातून तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरात - महाराष्टÑ सीमावर्ती भागातून बाजरीची आवक होत आहे. २१५० ते २३०० रुपये क्विंटल भाव आहेत. मध्यंतरी उन्हाळ्यामुळे ग्राहकी कमी होती, मात्र वातावरणात थंडावा निर्माण होताच मागणी वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याला ५० ते ६० टन बाजरीची आवक असल्याचे व्यापारी म्हणाले. बीड जिल्ह्यात मध्यप्रदेशातून गव्हाची आवक होत आहे. विविध नावाने ३० किलोचे सीलबंद कट्टे विक्रीस आहेत. साधारण प्रतीच्या गव्हाला २३००, मध्यम प्रतीचा गहू २६०० ते २७०० रुपये प्रती क्विंटल आहे. आठवड्यातून ४० ते ५० टन गव्हाची आवक येथील मोंढ्यात होत आहे. यात सिहोर मंडीतील दर्जेदार गहू ३८ ते ४० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. सोयाबीनची आवकही १५ दिवसात केवळ १०० क्विंटलच झाली. शेतकºयांकडे मालच नाही, स्टॉकिस्टच वेळप्रसंगी विक्रीस काढत आहेत. तूरची आठवड्याला ५० ते १०० क्विंटल आवक होत आहे. जुना हरभरा ३९०० ते ४३०० रुपये दराने विकला गेला. यामुळे बाजारात दरररोज शुकशुकाट असतो. खरेदी- विक्री होत नसल्याने उलाढालीवर परिणाम झाला आहे. यातच हमाल, चाळणा कामागरांना एखादी गाडी बाजारात आली तरच मोलमजुरी मिळते. स्थानिक आवक नसल्याने परराज्यातील धान्यावरच सध्या मोंढा बाजाराची मदार आहे.

टॅग्स :Beedबीडmarket yardमार्केट यार्डAgriculture Sectorशेती क्षेत्र