शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला गैरवर्तणूक भोवली; जिल्हा नियोजन समितीत निलंबनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 12:49 PM

निलंबनाच्या कारवाईचा ठराव घेण्यात आला तसेच तत्काळ कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निरोप देऊनही पालकमंत्र्यांच्या बैठकीस ते उपस्थित राहिले नव्हते.विविध विकासकामे, अनुपालन अहवाल व योजनांची माहिती मागविण्यात आलेली माहितीही त्यांनी दिली नाही.

बीड : नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा व माहिती देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना वेळोवेळी बोलावूनदेखील बैठकीस हजर राहिले नाहीत, त्यामुळे बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यावर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवण्यात आला, तसेच त्यांना निलंबित करावे, असा ठराव मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पारीत करण्यात आला.

जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या प्रसंगी मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावण्यात आले. वेळोवेळी माहिती मागवूनही डॉ.गुट्टे यांनी माहितीची पूर्तता केली नाही, तसेच काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निरोप देऊनही पालकमंत्र्यांच्या बैठकीस ते उपस्थित राहिले नव्हते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी सर्व विभागांकडून विविध विषयांची माहिती मागविण्यात येते. याप्रसंगी मुख्याधिकारी गुट्टे यांच्याकडून नगरपालिकेतील विविध विकासकामे, अनुपालन अहवाल व योजनांची माहिती मागविण्यात आली होती. दरम्यान, ती माहितीही त्यांनी दिली नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचा ठराव घेण्यात आला तसेच तत्काळ कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

डिसेंबरमध्येच माहिती दिलीअनुपालन बैठकीची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे १७ डिसेंबर २०२० रोजी दिली आहे. याबाबत मी त्यांना बोललोही होतो. सदरील अनुपालन हे जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यालयाकडून हलगर्जी झाल्याने नियोजन अधिकारी कार्यालयाकडे पोहोचले नाही. यात मुख्याधिकारी या नात्याने माझी काहीच चूक नाही. सदरील बाब पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या तत्काळ निदर्शनास आणून दिली आहे.- डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी नगरपालिका, बीड

माहिती सादर केलेली नाहीआमच्याकडे माहिती सादर केलेली नाही. आवक-जावक हे जिल्हाधिकारी कार्यालयातील आहे, अशीही माहिती दिल्यावर त्यांनी बोलायला हवे होते. बीड नगरपालिका आमच्या कार्यालयापासून खूप दूर नाही.- मिलिंद सावंत, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरविकास विभाग, बीड

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे