लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खून, दरोडे, अत्याचार, दरोडा, यासारख्या गुन्ह्यांचा १०० टक्के तपास लावला. तसेच शरीर व मालाविरूद्ध ८८.८० टक्के एवढे गुन्हे उघड करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच एकुण कामगिरीत राज्यातून पाचवा, तर मराठवाड्यात बीड पोलीस अव्वल राहिले आहेत. नुकतीच पोलीस महासंचालकांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे यांच्याकडून प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचाºयांना पाठपुरावा केला जात होता. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला.
गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरण राज्यभर गाजले. याचा तपास बीड पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात पूर्ण केला. यावेळी पो. नि. दिनेश आहेर हे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर येथे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांची नियुक्ती झाली. त्यांनी जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली.
वस्ती तपासण्याबरोबरच खून, दरोडे, चोºयांचा तपास लावण्याबरोबरच प्रतिबंधात्मक कारवायांवर जोर दिला. जिल्हा पोलीस दलाने एकत्रितपणे कामगिरी केल्यामुळेच राज्यात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावण्यात ते यशस्वी झाले आहेत. यासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुख व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच हे शक्य झाल्याचे श्रीधर म्हणाले. नागरिकांनीही सहकार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला.एमपीडीए, प्रतिबंधात्मक मध्येही प्र्रथमएमपीडीए कारवाईतही बीड जिल्हा पोलीस अव्वल आहेत. तडीपार, मोक्का कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवायातही बीड जिल्हा पोलीस दलाची कामगिरी उत्कृष्ट आहे. मागील अनेक वर्षांनी बीडने ही कामगिरी केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
जिल्हा पोलीस दल नेहमीच तत्परगुन्हे उघड करण्याबरोबरच चोरीचा तपास लावून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक सार्वजनिक कार्यक्रमातून परत केला जात आहे. त्यामुळे जनतेचा पोलिसांप्रती विश्वास वाढत आहे. यापुढेही जनतेसाठी चांगले कार्य करण्यासाठी जिल्हा पोलीस दल नेहमीच तत्पर राहील.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड
नागरिकांनी सहकार्य करावेवरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावणे सुरु आहे. गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाया केल्या जात आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांवरही आमचा जोर आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.- घनश्याम पाळवदे,पो. नि., स्थानिक गुन्हे शाखा, बीड