शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गुन्हे उघड करण्यात मराठवाड्यात ‘बीड पोलीस’ अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:35 PM

खून, दरोडे, अत्याचार, दरोडा यासारख्या गुन्ह्यांचा १०० टक्के  तपास लावून बीड जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकतीच पोलीस महासंचालकांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. औरंगाबाद, नांदेड सारख्या मोठ्या जिल्ह्यांना मागे टाकत बीड जिल्हा अव्वल राहिला आहे.

ठळक मुद्देखून, दरोडे, अत्याचार, दरोडा यासारख्या गुन्ह्यांचा १०० टक्के  तपास लावून बीड जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहेपोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे यांच्याकडून प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचार्‍यांना पाठपुरावा केला जातो

बीड : खून, दरोडे, अत्याचार, दरोडा यासारख्या गुन्ह्यांचा १०० टक्के  तपास लावून बीड जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकतीच पोलीस महासंचालकांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. औरंगाबाद, नांदेड सारख्या मोठ्या जिल्ह्यांना मागे टाकत बीड जिल्हा अव्वल राहिला आहे.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे यांच्याकडून प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचार्‍यांना पाठपुरावा केला जात होता. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला.

गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरण राज्यभर गाजले. याचा तपास बीड पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात पूर्ण केला. यावेळी पो. नि. दिनेश आहेर हे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर येथे पो. नि. घनश्याम पाळवदे यांची नियुक्ती झाली. त्यांनी जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली. वस्ती तपासण्याबरोबरच खून, दरोडे, चोर्‍यांचा तपास लावण्याबरोबरच प्रतिबंधात्मक कारवायांवर जोर दिला. जिल्हा पोलीस दलाने एकत्रितपणे कामगिरी केल्यामुळेच राज्यात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावण्यात ते यशस्वी झाले.

शरीर, मालाविरुद्धच्या गुन्ह्यात राज्यात प्रथमशरीर, मालाविरुद्धचे ८८.८० टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत. तसेच एमपीडीए कारवाईतही जिल्हा अव्वल आहे. तडीपार, मोक्का, प्रतिबंधात्मक कारवायातही बीड जिल्हा पोलीस दलाची कामगिरी उत्कृष्ट आहे.

गुन्ह्यांचे प्रकार    दाखल    उघड    प्रमाण (टक्के)खून                         ५६    ५६    १००खूनाचा प्रयत्न        १०५    १०४    ९९जबरी संभोग          ६६    ६६    १००दरोडा                     १२    १२    १००जबरी चोरी            ६८    ५६    ८२जुगार               १४२८    १४२८    १००दारुबंदी           २८८५    २८८५    १००जनतेचा पोलिसांप्रती विश्वास वाढत आहे

गुन्हे उघड करण्याबरोबरच चोरीचा तपास लावून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक सार्वजनिक कार्यक्रमातून परत केला जात आहे. त्यामुळे जनतेचा पोलिसांप्रती विश्वास वाढत आहे. यापुढेही जनतेसाठी चांगले कार्य करण्यासाठी जिल्हा पोलीस दल नेहमीच तत्पर राहील.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड

नागरिकांचे सहकार्य महत्वाचे 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावणे सुरु आहे. गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाया केल्या जात आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांवरही आमचा जोर आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.- घनश्याम पाळवदे, पो. नि., स्थानिक गुन्हे शाखा, बीड

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीड