शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

बीड पोलिसांची कारवाई; वाल्मीक कराड, आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:35 IST

विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच मकोकामध्ये महिलांचा आरोपी म्हणून समावेश झाला आहे.

बीड : वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, बीडची आठवले गँग, यानंतर आता आष्टीच्या भोसले गँगवर मकोका लावण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांत अशा प्रकारच्या तीन कारवाया केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच मकोकामध्ये महिलांचा आरोपी म्हणून समावेश झाला आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.

आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजिनाथ विलास भोसले, भरत विलास भोलसे, या दोन सख्ख्या भावांचा खून करून कृष्णा भोसले याला गंभीर जखमी केल्याची घटना १६ जानेवारी २०२५ रोजी वाहिरा येथे घडली होती. याप्रकरणी अजिनाथची पत्नी चिब्बा (वय ३०) हिच्या फिर्यादीवरून अंभोरा ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी यातील सहा आरोपींना अटकही केली होती. त्यानंतर अंभोरा पोलिसांनी या सर्व आरोपींच्या गुन्ह्यांची माहिती काढून मकोकाचा प्रस्ताव तयार केला. १० मार्च रोजी हा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे आला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी तो शिफारशीसह छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांना पाठविला. त्यांनी १९ मार्च रोजी याला मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे आता पहिल्या खुनाच्या गुन्ह्यात मकोकाचे कलम वाढविण्यात आले आहे. याचा पुढील तपास हा आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे हे करत आहेत.

...अशी आहेत आरोपींची नावेदीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले (वय ३५, रा. वाहिरा, ता. आष्टी), सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे, (वय ३५, रा. घु. पिंपरी, ता. आष्टी), मुद्दसर मन्सूर पठाण (वय ३८, रा. कानडी खुर्द, ता. आष्टी), सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले (वय ४०), शशिकला दीपक भोसले (वय ३५) व संध्या कोहिनूर भोसले (वय २१, सर्व रा. वाहिरा, ता. आष्टी), असे सहा आरोपी अटक आहेत. आणखी तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

...यांनी केली कारवाईपोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील, पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश साळवे, मुकेश एकशिंगे, केदार, सपोउपनि अभिमन्यू औताडे, नीलेश ठाकूर, बिभीषण चव्हाण आदींनी केली आहे.

आणखी एक टोळी निशाण्यावरपोलिसांनी २०२५ या वर्षात तीन टोळ्यांवर मकोका लावला आहे. आणखी एक टोळी पोलिसांच्या निशाण्यावर आहे. त्यांची सर्व कुंडली सीसीटीएनएस विभागातून काढण्यात आली आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करून लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीMCOCA ACTमकोका कायदा