शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Beed Railway: २२ वर्षांत केवळ ६६ किलोमीटरचे काम; ३५४ कोटींचा रेल्वे प्रकल्प पोहोचला ४ हजार ८०० कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 12:46 PM

१९५ किलोमीटरचे काम कधी होणार? या उत्तरासाठी पुन्हा एकदा बीड जिल्हावासियांना चळवळ उभारावी लागणार आहे.

- अनिल भंडारीबीड : अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेचे जिल्हावासियांचे स्वप्न शुक्रवारी पूर्ण होत असलेतरी ते नवीन आष्टी ते अहमदनगर या ६६ किलोमीटर अंतरापर्यंतच मर्यादीत आहे. १९९५ मध्ये ३५४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर झाला होता, तो ४ हजार ८०० रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारपासून ही रेल्वे निश्चित केलेल्या मार्गावर धावणार असली तरी नगर ते परळी रेल्वेमार्गाचे उर्वरित १९५ किलोमीटर मार्गाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी जनआंदोलनाची चळवळ जिवंत ठेवण्याची जबाबदारी नव्या पिढीतील सर्वच क्षेत्रांतील शिलेदारांवर आहे.

 रेल्वेची सुविधा नसल्याने बीड जिल्हा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास राहिला. निवडणूक आली की रेल्वेचे गाजर दाखवण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. १९८० मध्ये स्व. केशरकाकू क्षीरसागर या खासदार झाल्या. बीड जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक विकासासाठी नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग होणे गरजेचे असल्याची बाब पटवून देत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. त्यानंतर नगर-आष्टी-जामखेड-पाटोदा-केज अंबाजोगाई-परळी अशा मार्गाचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, यात बीडचा नामोल्लेख नसल्याने स्व. काकू यांनी अहमदनगर-बीड-परळी हा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान असताना खा. केशरकाकूंचाचा पाठपुरावा राहिला. परंतु सर्वेक्षणानंतर दिल्लीत बसलेल्या अधिकाऱ्यांनी विविध कारणे देत हा प्रकल्प परवडणारा नसल्याचा अहवाल दिला. त्यानंतर काकू यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री जाफर शरिफ यांची भेट घेऊन या मार्गाची गरज पटवून दिली. तर तत्कालीन रेल्वेमंत्री गनीखान चौधरी यांच्या निवासस्थानासमोर काकूंनी उपोषण केल्याची आठवण आंदोलनातील अनेकजण आजही सांगतात. त्यानंतर राजकीय मैदानावर श्रेयाची लढाई सुरू होती. १९९५ मध्ये या मार्गाला मंजुरी मिळून तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे व तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी यांच्या उपस्थितीत रेल्वे मार्गाचे भूमिपूजन बीडमध्ये झाले. त्यानंतर रजनी पाटील खासदार झाल्या. पुन्हा एकदा तत्कालीन रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत रेल्वे मार्गाचे भूमिपूजन झाले. परंतु, या काळात या मार्गासाठी झालेली तरतूद प्रकल्पाच्या किमतीच्या तुलनेत तोकडी होती. असाच निधी मिळत राहिला तर किमान ३०० वर्षे हा मार्ग पूर्ण करण्यास लागेल, असे विश्लेषण अनेकांनी केले होते. रेल्वेसाठी त्या त्या वेळच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पातळीवर पाठपुरावा केला होता. या प्रकल्पाचे ३६ हेक्टरचे भूसंपादन अद्याप बाकी आहे. ते लवकर पूर्ण व्हावे तसेच पुढील रेल्वेमार्गाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी सामाजिक, राजकीय पातळीवर वेळोवेळी पाठपुरवा करण्याची गरज आहे. 

स्वातंत्र्यसैनिकांचा पुढाकारबीडच्या रेल्वेसाठी जनआंदोलनातून उठाव होत राहिला. बीड जिल्हा स्वातंत्र्यसैनिक रेल्वे आंदोलन समितीच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांचा आधीपासून सनदशीर लढा सुरू होताच त्याचबरोबर तरुणाईसह जिल्ह्यातील जनता रस्त्यावर अनेकदा उतरली. अनेक आंदोलकांनी पोलिसांच्या काठ्या खाल्ल्या, जेलमध्ये जावे लागले. परंतु आंदोलनाची धग पेटत राहिली.

कालबद्धता नसल्याने रेल्वे प्रकल्पाला उशीरलालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वे प्रकल्पांसाठी राज्याने ५० टक्के भार उचलावा असे सुचिवले होते. त्यानुसार या रेल्वेमार्गासाठी राज्याने ५० व केंद्राने ५० टक्के भार उचलण्यासाठी निर्णय झाला. राज्य व केंद्राकडून निधीची तरतूद दरवर्षी होत असलीतरी प्रकल्पाची कालबद्धता ठरविलेली नसल्याने रेल्वे मार्गाचे काम संथगतीने होत राहिले आहे.

नगर - बीड- परळी मार्गावर आतापर्यंत २८०० कोटींचा खर्चगोड मानून घ्या सुरुवातीला अहमदनगर- बीड- परळी हा २५४ किलोमीटरचा मार्ग ३५४ कोटींचा होता. नंतर तो २६७ किलोमीटरचा झाला. २०१२ पर्यंत २८०० कोटीपर्यंत या प्रकल्पाची किंमत पोहचली. हा निधी डिसेंबर अखेरपर्यंत राज्याकडून १४०० व केंद्राकडून १४०० कोटी याप्रमाणे खर्च झाला आहे. २२ वर्षात केवळ ६६ किलोमीटरपर्यंतचे रेल्वेमार्गाचे काम होऊ शकले. या रेल्वे मार्गासाठी पुरेशा निधीची तरतूद होऊ शकली नाही, तसेच निधी उपलब्धतेनंतर काम संथगतीने झाले. यामुळे या प्रकल्पाची किंमत ४ हजार ८०० कोटींवर पोहचली आहे. वेळीच गतीने हा मार्ग झाला असता तर प्रकल्पावरचा खर्च कमी झाला असता आणि रेल्वे धावण्याचे जिल्हावासीयांचे स्वप्न साकार झाले असते. सध्या तरी ६६ किलोमीटर का होईना, गोड मानून घ्या, एवढेच समाधान मानावे लागत आहे.

२६१ किलोमीटर - अहमदनगर- बीड- परळी नवीन ब्रॉडगेज लाइन रेल्वेमार्ग

६६ किलोमीटर - अहमदनगर- आष्टी रेल्वेमार्गाचे काम आतापर्यंत झाले

१९५ किलोमीटर - अहमदनगर- आष्टी रेल्वेमार्गाचे काम होणे बाकी

३५४ कोटी -- मंजूर झाले त्यावेळची प्रकल्पाची किंमत

४८०५ कोटी- नवीन ब्रॉडगेज लाइन प्रकल्पाची अंदाजे किंमत

५० टक्के वाटा- भारत सरकार

५० टक्के वाटा- राज्य सरकार

१७ मोठे पूल- या रेल्वेमार्गावर

६३ लहान पूल- या रेल्वे मार्गावर आहेत.

३४ रस्ते- पुलाखालील आहेत.

१२ रस्ते - पुलावरील आहेत

आजपासून डेमू रेल्वे सेवानवीन आष्टी - अहमदनगर नवीन लाइनचे उद्घाटन आणि नवीन आष्टी-अहमदनगर डेमू सेवेचा शुभारंभ शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. हिरवा झेंडा दाखवून नवीन आष्टी - अहमदनगर डेमू सेवेचा शुभारंभ होणार आहे. कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोह येथे ही डेमू रेल थांबणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीड