लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा पारा चढत चालला आहे. सोमवारी पारा ३९ अंशावर पोहोचला. ऊन वाढल्याने बीडकरांच्या अंगाची लाही लाही झाली, तर रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून आला.
मागील काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी थंड हवेची झुळूक असते, तर दुपारी तीव्र उन्हाचे चटके जाणवतात. उन्हापासून बचावासाठी नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. सकाळी व सायंकाळच्या दरम्यान आपली कामे उरकून घेत असल्याचे दिसून येत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. याचा परिणाम बाजारपेठेवरही होऊ लागल्याचे दिसत आहे.
उन्हामुळे डोळ्यांना जळजळदुपारच्या वेळी उन्हाचा पारा वाढल्याने दुचाकी चालविताना वाहनधारकांना डोळ्यांना त्रास होत आहे. तसेच पादचाऱ्यांनाही याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. यापासून बचावासाठी चष्म्याचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.
दिवसभर झळा१८ मार्च रोजी किमान तापमान २३ अंश, तर कमाल तापमान ३३ अंश होते. २२ तारखेपर्यंत हे तापमान स्थिर राहिले. त्यानंतर २३ तारखेला पुन्हा एक अंश सेल्सियने कमाल तापमानात घट झाली. २४ तारखेला पुन्हा कमाल तापमान ३३, तर किमान २० अंशावर पोहोचले. २५ मार्चला मात्र तापमान ३६ अंशावर पोहोचले. २६ मार्च रोजी तापमान ३९ अंश सेल्सियस एवढे झाले. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा दिवसभर बीडकरांना जाणवल्या.