लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आधी दूध उत्पादकांचे आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे बारा दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाला सुमारे १ कोटी ८३ लक्ष ३० हजार ९९८ रुपयांचा फटका बसला आहे.बीड विभागातील बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर, पाटोदा आणि आष्टी आगारातून यात्रा स्पेशल आणि नियमित बस फेऱ्यांचे नियोजन होते. मात्र २० जुलै ते १ आॅगस्ट दरम्यान आंदोलनाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक तसेच काही ठिकाणी लालपरी व शिवशाही बसेस जाळण्याचे प्रकार घडले. त्यामुळे हिंसक परिस्थिती असलेल्या भागात वातावरण निवळण्यापर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बस आणि प्रवाशांचे नुकसान टळले. परंतू आंदोलन काळात जवळपास ६ हजार ४६१ बस फेºया रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे ६ लाख २८ हजार ७८५ किलोमीटर इतक्या धावणाºया बसफेºया होऊ शकल्या नाहीत. परिणामी १२ दिवसात होणारे बीड विभागाचे १ कोटी ८३ लाख ३० हजार ९९८ रुपयांचे अपेक्षित उत्पन्न बुडाले.९ दिवस परभणी बससेवा बंदबारा दिवसात काही दिवस पूणे, औरंगाबाद, जालना, सोलापूर मार्गावरील बससेवा बंद ठेवावी लागली तर परभणी, नांदेड मार्गावरील बससेवा सलग नऊ दिवस बंद ठेवावी लागली.
बीड : १२ दिवसांत एसटीला १.८३ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:14 AM