शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
4
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
5
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
6
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
7
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
8
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
9
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
10
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
11
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
12
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
13
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
14
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
15
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
16
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
17
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
18
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
19
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
20
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

बीडच्या एसपींची भूमिका स्पष्ट; पोलिस अधिकाऱ्यांनो ‘फिल्डिंग’ लावू नका; ‘मेरिट’ वरच ठाणेदार!

By सोमनाथ खताळ | Updated: March 17, 2025 17:05 IST

बीड जिल्ह्यात सायबरसह २९ पोलिस ठाणे आहेत.

बीड : पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी होण्यासाठी अनेक सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक हे राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदारांसह इतर लोकांच्या माध्यमातून ‘फिल्डिंग’ लावत असतात. आतापर्यंत याचा ‘फायदा’ही अनेकांना झाला, परंतु आता तसे चालणार नाही. ज्यांच्यात गुणवत्ता आहे, अशांनाच ठाणेदार म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश ठाणेदार बदलणार आहेत. यात ‘फिल्डिंग’ लावून बसलेल्यांनाही ‘कंट्रोल’ केले जाणार आहे.

जिल्ह्यात सायबरसह २९ पोलिस ठाणे आहेत. परंतु, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था आणि राजकीय नेत्यांकडून होत असलेले आरोप पाहता १०७ अधिकाऱ्यांनी बीडच्या बाहेर बदली करण्यासाठी विनंती केली आहे. यात पोलिस उपनिरीक्षक ते उपअधीक्षक यांच्यापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, परंतु यातीलच अनेकांनी या आगोदर ‘फिल्डिंग’ लावून पोलिस ठाणे घेतले होते. काही जण तर मंत्रालयात ‘फिल्डिंग’ लावून आणि ‘टेंडर’ भरून खास बीडमध्ये आले होते, परंतु पोलिस अधीक्षक म्हणून नवनीत काँवत यांनी पदभार घेतला आणि अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकली. जे ठाणे हवे म्हणणारेही आता आम्हाला नियंत्रण कक्षात द्या किंवा बदली करा, अशी विनवणी करू लागले आहेत. परंतु, आपण कोणाच्याही बदलीची शिफारस करणार नाही. आहे त्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास नवनीत यांनी व्यक्त केला आहे.

१५ ठाणे होणार रिकामे१०७ अधिकाऱ्यांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केला आहे. यामध्ये २९ पैकी १५ ठाणेदार आहेत. तसेच, विशेष शाखांचेही प्रभारी अधिकारी आहेत. आता याच ठिकाणी गुणवत्ता असलेल्या अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली जाणार आहे. पहिल्यांदाच प्रामाणिक अधिकाऱ्यांना ‘फुकटात’ ठाणेदार होता येणार, असे चित्र पाहायला मिळत आहे.

एलसीबीत कोण बसणार?पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांचीही परळीहून स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली. त्यानंतर आ. सुरेश धस यांनी त्यांच्यावर आरोप केले. शेख यांनीही बदलीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर कोण येणार? याकडे लक्ष लागले आहे. येथे येण्यासाठी अनेक अधिकारी हे थेट मंत्रालयातून ‘फिल्डिंग’ लावत असतात. परंतु, आता येथे जर मेरिट आणि ज्येष्ठतेचा नियम लागू केला, तर दोन ते तीनच अधिकारी पात्र ठरतात. त्यामुळे या पदाकडेही लक्ष लागले आहे.

बजरंग सोनवणे, सुरेश धस यांच्यावर आरोपजिल्ह्यातील २९ पैकी एका ठाणेदाराने आपल्या विनंती अर्जामधून थेट खा. बजरंग सोनवणे आणि आ. सुरेश धस यांच्यावर आरोप केले आहेत. मतांचे राजकारण साधण्यासाठी काही पण आरोप करत असल्याची टीका त्यांनी यातून केली आहे. तसेच, बीडच नव्हे, तर मराठवाड्याच्या बाहेर आपली बदली करावी, अशी विनंती त्यांनी पोलिस अधीक्षकांमार्फत महासंचालकांना पाठविलेल्या अर्जातून केली आहे. आरोप करणारे ठाणेदार कोण? याची पोलिस दलात सध्या चर्चा सुरू आहे.

मेरिट पाहूनच नियुक्तीविनंती बदलीसाठी अनेकांनी अर्ज केले आहेत, परंतु त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. तर, ठाणेदार बदलण्याची प्रक्रिया ही मे महिन्यात राबविली जाईल. नियुक्ती देताना नाव, चेहरा किंवा शिफारस यांचा विचार केला जाणार नाही. मेरिट पाहूनच त्यांना नियुक्ती दिली जाईल. जर कोणी ‘फिल्डिंग’ लावली, तर त्यांचा अहवाल तयार केला जाईल.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी