शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

बीडचे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहणार रॉकेट लॉन्चिंग; ३३ विद्यार्थी 'इस्रो'कडे रवाना

By शिरीष शिंदे | Published: April 17, 2023 7:26 PM

या सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केंद्र, तालुका व जिल्हा परीक्षेद्वारे करण्यात आलेली आहे.

बीड: जिल्ह्यातील ३३ विद्यार्थी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी रवाना सोमवारी सकाळी ९ वाजता बीड शहरातील जिल्हा परिषदेच्या प्रांगणातून रवाना झाले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सदरील सहलीस हिरवा झेंडा दाखविला.

जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यां साठी इस्रो शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हास्तरावरुन सर्व नियोजन सुरू होते. या सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केंद्र, तालुका व जिल्हा परीक्षेद्वारे करण्यात आलेली आहे. एकूण २२२७६ विद्यार्थ्यांमधून केंद्रस्तर, तालुकास्तर, आणि जिल्हास्तर अशा ३ परीक्षा घेऊन त्या यश मिळवलेल्या गुणवत्ता धारक ३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थी बेंगलोर येथील विश्वेश्वरय्या म्युझियम, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इस्त्रो, थुंबा तिरुअनंतपुरम येथील रॉकेट लॉन्चिंग, तिरुअनंतपुरम येथील प्राणी संग्रहालय आणि कन्याकुमारी अशा ठिकाणी जाणार आहेत. या सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एस.पी. ठाकूर, सीईओ अजित पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात दोन विद्यार्थी युवराज सानप व भाविका फड यांचे स्वागत केले. यावेळी पालक, शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिकारी गेले विद्यार्थ्यांसोबतसदरील सहलीसोबत मार्गदर्शक व काळजीवाहक म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, , उपशिक्षणाधिकारी (प्रा.) अजयकुमार बहिर, आष्टी येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, अंबाजोगाई येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वासंती चव्हाण, इस्त्रो, नासा शैक्षणिक अभ्यास दौरा जिल्हा समन्वयक राहूल चाटे, कैलास पवार व श्रीमती उषा लव्हारे हे सोबत रवाना झाले आहेत. सर्व विद्यार्थी प्रत्यक्ष रॉकेट लॉन्चिंग बघणे व पहिल्यांदा विमानाने जाण्यासाठी आतुर झाले आहेत. या सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षेची आवड व शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थी