शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

बीड, वडवणी, पाटोद्यात ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:27 AM

बीड : अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसने सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल मोर्चाद्वारे रान पेटविलेले आहे. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातुन सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे, यावर मोठा जनाक्रोश सुरु आहे. जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जात आहेत. बुधवारी बीड, पाटोदा व वडवणीमध्ये हल्लाबोल मोर्चा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ...

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

बीड : अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसने सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल मोर्चाद्वारे रान पेटविलेले आहे. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातुन सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे, यावर मोठा जनाक्रोश सुरु आहे. जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जात आहेत. बुधवारी बीड, पाटोदा व वडवणीमध्ये हल्लाबोल मोर्चा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बीडमध्ये दुचाकी रॅलीने दणाणला परिसरबीड : शेतकरी आणि जनसामान्यांच्या विरोधातील भाजप सरकारविरूद्ध बीड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवणी फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारविरोधी घोषणांचा हल्लाबोल करीत दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये माजी आमदार सय्यद सलीम, ज्येष्ठ नेते डी.बी.बागल, माजी आमदार राजेंद्र जगताप यांची उपस्थिती होती. शेतकºयांचे सरसकट कर्जमाफ करून सातबारा कोरा करा, बीड जिल्ह्यातील लोडशेडींग तातडीने बंद करा, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, खरिप हंगामातील पिकविमा तातडीने वाटप करा, शेतीमालाला हमीभाव द्या, खरेदी केंद्र सुरू करा, शेतातील नादुरूस्त डी.पी. दुरूस्त करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.सकाळी अकरा वाजता शिवणी फाटा येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, किसानसभेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, बबन गवते, दिलीप भोसले, शिवाजी जाधव, भाऊसाहेब डावकर, अमर नाईकवाडे, रमेश चव्हाण, फारूक पटेल, फेरोज पठाण, सुधीर काकडे, सचिन शेळके, उत्तरेश्वर सोनवणे, दत्तुभाऊ जाधव, देवकते, खदीर ज्वारीवाले, इरफान बागवान, युवराज जगताप, जयतुल्ला खान, प्रभाकर पोकळे, भैय्या मोरे, रणजित बनसोडे, प्रेम चांदणे, गणेश तांदळे, किशोर पिंगळे, बाजीराव बोबडे, बरकत पठाण, शेख इकबाल यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.वडवणीत सरकारविरोधात घोषणाबाजीभाजपच्या तीन वर्षाच्या काळात फक्त खोटी आश्वासने फसव्या योजना व जाहिरात बाजी करून जनतेला गाजर दाखवत या देशातील व राज्यातील शेतकरी कष्टकरी समाजासह व्यापाºयांना भाजप सरकारने देशोधडीला लावण्याचे काम केले. आता जनताच भाजप सरकारला जागा दाखवून देईल, असा आरोप माजी राज्यमंत्री प्रकाश सोंळके यांनी वडवणीतील मोर्चात केला. यावेळी राष्ट्रवादीचे जयसिंह सोंळके, रेखा फड, सोमनाथ बडे, पंजाबराव शिंदे, विनोदकुमार नहार, दिनेश मस्के, प्रशांत सावंत, संदिपान खळगे, गणेश शिंदे, भगवानराव लंगे, भारत जगताप, तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, विश्वास आगे, औदुंबर सांवत, शेषेराव जगताप, संतोष पवार, अस्लम कुरेशी, सचिन लंगडेसह कार्यकर्ते, शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते. हल्लाबोल अांदोलन हे वसंत नाईक चौक पासून पदयात्रा तहसील कार्यालयात धडकले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. सदरील मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार शेख यांना देण्यात आले.

पाटोद्यातही हल्लाबोलपाटोदा : पाटोदा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने शिवभूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तहसीलवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. कर्ज माफीची खोटी आश्वासने, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतीमालाला मिळणारा हमीभाव, गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव अशा खोट्या आश्वासने देणाºया भाजप सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यता आल्याचे राष्ट्रवादीने कळविले आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करून हल्लाबोल आंदोलन झाले. यावेळी मोर्चात बाळासाहेब आजबे, शिवाजी राऊत, महेबूब शेख, अण्णासाहेब चौधरी, सतीश बडे, गुलाबराव घुमरे आदी सहभागी झाले होते.