शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बीडच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:16 AM

बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होणार असला तरी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होईल.

ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणार । सकाळी आठपासून सुरू होणार मतमोजणी । कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष ?

सतीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होणार असला तरी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होईल.

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव यांच्यासह ३६ उमेदवार हे रिंगणात उतरले होते. शहरातील कुर्ला रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. सर्वप्रथम टपाली मतदान मोजले जाईल. प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबलवर म्हणजे एकूण ८४ टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. बीड, माजलगाव, गेवराई, आष्टी, केज आणि परळी अशा सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण ८४ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन मोजणीस घेण्यात येणार असून, या ८४ ईव्हीएमच्या मतमोजणीची एक फेरी असेल. अशा एकूण ३२ फेऱ्या होतील. गेवराई, बीड, माजलगाव, परळीची मतमोजणी २९ फेºयातच संपेल. गेवराईमध्ये ३९६ मतदान केंद्रे (२९ फेºया), माजलगाव - ३७४ (२७ फेºया), बीड - ३७१ (२७ फेºया), आष्टी - ४३८ (३२ फेºया), केज - ४०७ (२९ फेºया) आणि परळी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३३९ असून, २५ फेºया होतील. एकूण २३२५ मतदान केंद्रे आहेत.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPankaja Mundeपंकजा मुंडे