बीड: इंम्फाळ (मनिपुर) येथे पार पडलेल्या ६४ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडची खेळाडू नयन अविनाश बारगजे हीने १४ वषार्खालील मुलींच्या ३८ किलोवरील गटात सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या महाराष्ट्र संघानेही २५ गुणांसह राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणूनही बीडच्या अविनाश बारगजे यांच्याकडे जबाबदारी होती.
मनिपुर राज्यातील इम्फाल येथे शासनाची भारतीय शालेय खेळ महासंघ आयोजित ६४ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २५ ते ३० नोव्हेंबर २०१८ दरम्यान पार पडली. या स्पर्धेत नयन बारगजे (बीड) व रिद्दी मसने (मुंबई उपनगर) यांनी सुवर्णपदके जिंकली. निलम जोशीलकर (पुणे), श्रीनिधी काटकर (पुणे), गायत्री बिनवडे (मुंबई उपनगर), मानसी चौघुले (ठाणे), प्रतिक्षा चव्हाण (सांगली) यांनी रौप्यपदके तर स्वरांजली पाटील (सांगली) व रोशन बेदमुथ्था (पुणे) यांनी कांस्यपदके पटकावली.
महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून अविनाश बारगजे ( मुले) व लता कलवार ( औरंगाबाद) तर व्यवस्थापक म्हणून जगदिश मारागणे (रायगड ) यांनी काम पाहीले. महाराष्ट्र शालेय तायक्वांदो संघात निवड झालेल्या ११ मुले व ११ मुलींनी मनिपुर, इम्फाळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सहभाग नोंदवला. बीडच्या नयनने गत वर्षी तेलंगणा येथे पार पडलेल्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तीचे हे सलग ४ थे राष्ट्रीय सुवर्णपदक आहे. २ सुवर्णपदके, ५ रौप्यपदके व २ कांस्यपदके अशी एकूण ९ पदकांसह महाराष्ट्र संघाला मुलींच्या गटात प्रथम क्रमांकासह विजेतेपद मिळाले.
आ. जयदत्त क्षीरसागर, डॉ. भारतभुषण क्षीरसागर, प्रा.डॉ.राजेश क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, नितिनचंद्र कोटेचा, सुनिल राऊत, क्रीडा मार्गदर्शक अजय पवार, प्रविण बोरसे, संतोष वाबळे, दिनकर चौरे, भारत पांचाळ, बन्सी राऊत, मनेश बनकर, संतोष बारगजे, रमेश मुंडलीक, शशांक साहू, विनोदचंद्र पवार, आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ, महिला प्रशिक्षिका जया बारगजे, राष्ट्रीय खेळाडू सचिन जायभाये, अनिस शेख, सचिन कातांगळे, प्रा. पांडूरंग चव्हाण, श्रीकांत पाटील यांनी सर्व खेळाडूंचे स्वागत केले.