शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

बीडच्या खाजगी डॉक्टरांचे ‘दातृत्व’ राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:22 AM

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात बीडच्या डॉक्टरांचे दातृत्व अनमोल राहिले आहे. या अभियानात राज्यातील ६९९ पैकी एकट्या बीडमधील तब्बल १०२ खाजगी डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. वर्षभरात तब्बल ६० हजार ३४३ गरोदर मातांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार केले आहेत. बीडची ही कामगिरी राज्यात अव्वल आहे.

ठळक मुद्देसुरक्षित मातृत्व अभियान : १०२ डॉक्टरांकडून ६० हजार गरोदर मातांची तपासणी

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात बीडच्या डॉक्टरांचे दातृत्व अनमोल राहिले आहे. या अभियानात राज्यातील ६९९ पैकी एकट्या बीडमधील तब्बल १०२ खाजगी डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. वर्षभरात तब्बल ६० हजार ३४३ गरोदर मातांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार केले आहेत. बीडची ही कामगिरी राज्यात अव्वल आहे.माता मृत्यूदर कमी होऊन मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आरोग्य विभागाने सुरू केले. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे अभियान हाती घेण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची संख्या अपुरी असल्याने गर्भवती मातांची उपचाराअभावी परवड होत होती. दुरवरून त्यांना जिल्हा रूग्णालय गाठावे लागत असे. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टरांना आवाहन करीत स्पवयंसेवक म्हणून सेवा देण्याची विनंती केली. यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यात मिळाला.शासकीय रुग्णालयातील प्रसुतीत बीड तिसऱ्या क्रमांकावर४पूर्वी शासकीय रूग्णालयात प्रसुती करण्यास महिला पुढे येत नव्हत्या. परंतु या अभियानामुळे महिलांमध्ये जनजागृतीबरोबरच योग्य उपचार होत आहेत. त्यामुळे महिला शासकीय रूग्णालयात जावून प्रसुती करून घेतात.४पूर्वी हे प्रमाण जवळपास ५० टक्यापर्यंत होते. आता ते ८४ टक्यांवर पोहचले आहे. नंदुरबार, गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यांनतर बीडचा तिसरा क्रमांक लागतो.जिल्ह्यात ७० ठिकाणी डॉक्टर करतात तपासणी४राज्यात एकूण ६९९ खाजगी डॉक्टरांपैकी एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल १०२ डॉक्टर हे कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला हे डॉक्टर नियुक्त केलेल्या ७० ठिकाणी जावून गरोदर मातांची तपासणी, सोनोग्राफी व इतर उपचार करतात.४११ महिन्यात ६० हजार ३४३ गरोदर मातांची तपासणी केली असून पैकी १०७२ माता अति जोखमीच्या असल्याचे समोर आले आहे. अभियान यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.माता मृत्यू रोखण्यात यश; दर शून्यावर नेण्यासाठी प्रयत्न२०१६-१७ मध्ये २३ मातांचा मृत्यू झाला. २०१७-१८ मध्ये ते १२ वर आले. सध्या मागील सहा महिन्यात केवळ तीन मातांचा मृत्यू झाला आहे. यावरून माता मृत्यू दर कमी करण्यातही आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसते. मृत्यू दर शुन्यावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ.थोरात यांनी सांगितले.....अभियान यशस्वी करण्यासाठी १०२ खाजगी डॉक्टरांकडून खूप मोठे सहकार्य मिळत आहे. सर्वसामान्यांना तत्पर, तात्काळ व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून याला यश मिळत आहे. खाजगी डॉक्टर, जिल्हा रूग्णालय टिम, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांची टिम यासाठी परिश्रम घेत आहेत. यामुळेच हे शक्य होत आहे.- डॉ.अशोक थोरातजिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटल