लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महाराष्ट्र पोलीस दलाने घेतलेल्या वादविवाद स्पर्धेत बीडने उत्कृष्ट वक्तृत्वाच्या जोरावर राज्यातील ४० महिला पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर मात करीत पहिले व तिसरे बक्षीस खेचून आणले. बीडच्या महिला पोलिसांनी मुंबईत विजयाचा झेंडा फडकावत जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. अधीक्षक जी.श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले.
‘महिलांना खºया अर्थाने स्वातंत्र्य आहे काय?’ या विषयावर बीडमध्ये प्रथमत: निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये दोन महिला अधिकारी व ३३ महिला कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक स्वाती लांबखडे, कल्पना चव्हाण, जे.व्ही. सानप, आशा जाधव यांनी बाजी मारली. या चौघींनाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. येथे राज्यातून ४० महिला अधिकारी तसेच कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला.
या सर्वांना मागे टाकत आपल्या वक्तृत्वाच्या अन् अभ्यासाच्या जोरावर बीडच्या आशा जाधवने प्रथम क्रमांक पटकावला तर कल्पना चव्हाणने तृतीय क्रमांक पटकावून जिल्ह्याचे नावलौकिक केले. या सर्वांना विशेष पोलीस महासंचालक कैसर खलीद यांच्या हस्ते ढाल, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, सुरेश बुधवंत, पोनि एस.जे. माने, पोउपनि दीपाली गित्ते यांनी यशस्वी कर्मचाºयांचे स्वागत केले. शिवाजी राठोड, वसिष्ठ वाघमारे, कलीम इनामदार यांनी परिश्रम घेतले.