केज : २६ जुलै ते १२आॅगस्ट या २१ दिवसांच्या कालावधीत केज मतदारसंघात आमदार जनकल्याण अभियान राबविण्यात आले. २०८ गावातील ४५ हजार नागरिकांना या अभियानातून शासनाच्या अकरा विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली. तर राज्य व केंद्र सरकार जनहिताच्या योजना राबवत असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी केले.बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आमदार कल्याण जनकल्याण अभियान मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी खा. डॉ. प्रितम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर आ. प्रा. संगीता ठोंबरे, डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव, समाज कल्याण सभापती संतोष हांगे, अंबाजोगाईच्या उपनगराध्यक्ष सविता लोमटे, संगिता काळे, कमलाकर कोपले, बालासाहेब शेप, संजय गंभीरे, सुरेश कराड, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रवीण देशपांडे, पंजाब देशमुख, दत्ता धस, सुधाकर लांब, तहसीलदार दुलाजी मेंढके, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने आदी उपस्थित होते.आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी केज मतदारसंघात आमदार जनकल्याण अभियान राबविण्यात आल्याचे सांगून सविस्तर माहिती दिली. या अभियानातून एक लाख लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ देण्याचे उदिष्ट ठेवले होते, असे त्या म्हणाल्या. हे काम पुढेही अविरतपणे चालू राहणार असून मतदार संघातील वंचितांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. केज मतदारसंघाच्या विकासासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिल्याने यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह विविध विकास योजना राबविण्यात आल्याची माहिती ठोंबरे यांनी दिली.या मेळाव्यात दिवंगत माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज तसेच सांगली, कोल्हापूर येथील पूरामधील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मेळाव्यास वीस हजारापेक्षा अधिक नागरीक, वयोवृद्ध, नागरीक, महिला आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक समाजकल्याण सभापती संतोष हांगे यांनी केले. सूत्रसंचलन हारुण इनामदार यांनी तर दत्ता धस यांनी आभार मानले.प्रारंभी आमदार जनकल्याण अभियानात काम करणाऱ्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.केंद्र व राज्यातील सरकार जनहितकारी : खा. प्रीतम मुंडेप्रारंभी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर आमदार जनकल्याण अभियानांतर्गत राबविलेल्या आयुष्यमान भारत, बांधकाम मजूर, सौभाग्य योजने अंतर्गत विद्युत मिटरचे वितरण, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसह माझी कन्या भाग्यश्रीच्या लाभार्थींना खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या हस्ते योजनेचा लाभ देण्यात आला.आ. ठोंबरे यांनी राबविलेल्या अभियानातून केज मतदारसंघातील गावागावात शासनाच्या योजनेपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लाभ देण्यात आल्याबद्दल खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी प्रशंसा केली. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचे खा. मुंडे म्हणाल्या.
२०८ गावांतील ५४ हजार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:31 AM
२६ जुलै ते १२आॅगस्ट या २१ दिवसांच्या कालावधीत केज मतदारसंघात आमदार जनकल्याण अभियान राबविण्यात आले. २०८ गावातील ४५ हजार नागरिकांना या अभियानातून शासनाच्या अकरा विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली.
ठळक मुद्देजनकल्याण अभियान : केजमध्ये नागरिकांची मोठी उपस्थिती