....
शिरूरसह तालुका सुन्न
शिरूर कासार :
गेली दोन तीन दिवसांपासून खून, अकस्मात, आत्महत्या व कोरोनामुळे मृत्यू अशा एकापाठोपाठ एक घटना घडल्या असल्याने शहरासह तालुका सुन्न झाला आहे. सराफाच्या खुनामुळे तालुका हादरून गेला असून, सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे.
...
भाववाढीने बांधकामे ठप्प
शिरूर कासार:
सध्या लाॅकडाऊन सुरू आहे. तरीही बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातच बांधकाम साहित्य भाववाढीने उच्चांक गाठल्याने बांधकामांचे अंदाजपत्रक कोलमडत आहे. काहींना बांधकाम थांबवावे लागले आहे.
...
मोबाइलवर ऑनलाइन दुकानदारी
शिरूर कासार : सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. कडक नियमावली असल्याने दुकान बंद आहेत. मात्र जरुरी असलेल्या वस्तू खरेदीसाठी मोबाइलवरून व्यवहार केले जात आहेत. यामुळे गरजही भागते आणि कोरोना नियमाचे पालनही होत असल्याचे दिसून येते. एकंदरीत सध्या ऑनलाइनवरच दुकानदारी सुरू आहे.
...
मोंढा बंद, व्यवहार ठप्प
शिरूर कासार : तालुक्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. यामुळे मोंढा बंद आहे. यामुळे शेतीमाल विक्रीत अडथळे येत आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे कशी खरेदी करावीत, याची चिंता लागली आहे. तरी बाजार समित्या उघडाव्यात, अशी मागणी होत आहे.