शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

बीडमध्ये तूर खरेदी सुरु, पण ठेवणार कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:44 AM

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीला प्रारंभ झाला असलातरी पहिले चार दिवस खरेदी केंद्रांवर शुकशुकाट जाणवला. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्के तूर खेदीची शक्यता आहे. त्यामुळे नाफेडच्या केंद्रांवर आलेली तूर खरेदीनंतर कुठे ठेवायची असा प्रश्न आतापासूनच स्थानिक यंत्रणेला पडला आहे.राज्यात नाफेडमार्फत आधारभूत दराने तूर खरेदीसाठी १५९ केंद्र ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील ‘वखार’चे ५ गोदाम आधीच फुल्लयंदा अडीच लाख क्विंटल खरेदीची शक्यता; वेळीच उपायांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीला प्रारंभ झाला असलातरी पहिले चार दिवस खरेदी केंद्रांवर शुकशुकाट जाणवला. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्के तूर खेदीची शक्यता आहे. त्यामुळे नाफेडच्या केंद्रांवर आलेली तूर खरेदीनंतर कुठे ठेवायची असा प्रश्न आतापासूनच स्थानिक यंत्रणेला पडला आहे.राज्यात नाफेडमार्फत आधारभूत दराने तूर खरेदीसाठी १५९ केंद्र सुरु केले. त्यापैकी सर्वाधिक १२ केंद्र बीड जिल्ह्यात आहेत. शासनाने हमीदर ५४५० निश्चित केलेला असून हेक्टरी मर्यादा ४.८८ ठरविण्यात आल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई, आष्टी, पाटोदा, केज, धारुर, वडवणी, शिरुर आणि कडा येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मागील वर्षी खरेदी केलेल्या तुरीचे वाहतूक व इतर बिले देण्यास निधीच्या अडचणींमुळे विलंब होत असल्याने पहिल्या दिवशी १ फेब्रुवारी रोजी केवळ तीन केंद्र सुरु झाले. नंतर २ रोजी उर्वरित केंद्र सुरु करण्यासाठी हालचाली झाल्या. नाफेडमार्फत जसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे निधी देण्यात येणार असल्याचे सांगून मार्केटिंग फेडरेशनने त्यांच्या पातळीवर निधीची पुर्तता करुन दिली. शेतकºयांच्या मालाचा विचार करता शनिवारी बारा केंद्रांवर तूर खरेदीसाठी केंद्र सज्ज झाले.मागील वर्षी जिल्ह्यात विक्रमी ४ लाख ३८ हजार ३२६ क्विंटल तूर खरेदी झाली होती. अनेक अडचणींचा सामना यंत्रणेसह शेतकºयांना करावा लागला होता. तर खरेदी केलेली तूर शासनाच्या बीडसह इतर जिल्ह्यातील गोदामात साठवणूक करावी लागली. यंदा ३९ हजार ६९४ हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाल्याने व पाऊसपाणी चांगले असल्याने बंपर उत्पादन झाले आहे. आॅनलाईन नोंदणी व तातडीची पैशाची निकड यामुळे यंदा केंद्रांवर अडीच लाख क्विंटल तूर खरेदी होण्याचा अंदाज आहे.सध्या जिल्ह्यात गोदाम उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे खरेदी केलेली तूर सांभाळण्याचा व साठवणुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. वखार महामंडळाकडे गोदाम उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे. त्यात लांब अंतराचे गोदाम खर्चिक ठरणार आहेत. त्यामुळे गोदामांची शोधाशोध करण्याची वेळ सरकारी यंत्रणेवर येऊन ठेपल्याचे चित्र दिसत आहे.हेक्टरी मर्यादेचा फेरविचार कराकेंद्रांवर तूर आणणाºया शेतकºयांना सध्या हेक्टरी मर्यादा ४.८८ इतकी आहे. कृषी विभागाच्या पाहणी अहवालानुसार पीक कापणीचे २६४ प्रयोग घेण्यात येत आहेत.आतापर्यंत २०० प्रयोग केल्याची माहिती आहे. उर्वरित ६४ प्रयोग झाल्यानंतर अंतीम अहवाल येणार आहे.कृषी अहवाल तसेच वस्तुस्थिती लक्षात घेता मर्यादेबाबत फेरविचार केल्यास आधारभूत केंद्रावर तुरीची मोठी आवक होऊ शकते.मर्यादा १० क्विंटलपर्यंत वाढविण्यात यावीजिल्ह्यात सुपीक जमीन, पाण्याची व्यवस्था आणि पीक संरक्षणासाठी प्रभावी उपाय करणारे बहुतांश शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांनी पेरलेल्या तुरीचा उतारा हेक्टरी सात ते दहा क्विंटलपर्यंत मिळालेला आहे. त्यामुळे हेक्टरी मर्यादेत वाढ करुन ती ९- ते १० क्विंटल करावी अशी मागणी शेतकरी बाबुराव आडगाव, केशव नामदेव माने व अन्य शेतकºयांनी केली आहे.उतारा वाढण्याची शक्यताजिल्ह्यातील काही तालुके वगळता तुरीचा उतारा चांगला मिळालेला आहे. कृषी विभागाच्या अंतीम अहवालात एकरी उतारा वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील प्रयोगात ४.८८ तर दुसºया टप्प्यात ५.१४ तर प्रशासन काय निर्णय घेत आहे याकडे लक्ष लागले आहे.गोदामाबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलाया वर्षी तूर खरेदी अडीच लाख क्विंटल होण्याची शक्यता आहे. तूर खरेदीनंतर कुठे पाठवायची याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. बारदाना उपलब्ध आहे. यंत्रणा सज्ज आहे. गोदामाबाबत वखार महामंडळाच्या वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करुन एसएमएसप्रमाणे तूर खरेदी केंद्रांंवर आणावी.- एस. के. पांडवजिल्हा मार्केटिंग अधिकारी, बीडएसएमएस मिळूनही तूर आणली नाहीपहिल्या चार दिवसात केंद्र सुरु करण्यासाठी तजवीज झाली. नोंदणी केलेल्या शेतकºयांना एसएमएस मिळाले परंतु, त्यांनी तूर खरेदी केंद्रावर आणली नाही. त्यामुळे संबंधितांना फोनद्वारे संपर्क करुन तूर आणण्याबात सांगण्यात येत आहे. एसएमएस पोहचलेल्या २६ पैकी चारच शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आणली होती. रक्कम वेळेवर मिळेल काय ? हेक्टरी मर्यादा कमी या कारणांमुळे शेतकरी संभ्रमात आहे.