लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील पंचायत समितीमध्ये दर महिन्यात बीडीओ पदाचा कार्यभार कोण्यातरी इतर अधिका-यांवर सोपविला जात होता. कर्मचारी व अधिकारी ‘आया राम गया राम’ पध्दतीने वागत होते. कधीही यावे आणि सही करून जावे असा प्रकार सर्रास सुरु होता. १५ दिवसांपूर्वी बीडीओ म्हणून रुजू झालेले जि.प स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी सोमवारी अचानक पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचा-यांची झाडाझडती घेतली. स्वच्छता कशी करावी हे समजावून सांगताना शिस्तीचे धडे दिले.
पंचायत समितीमध्ये अनेक दिवसांपासून बीडीओंचे पद रिक्त आहे. नियुक्त अधिकारीही राजकीय भाऊगर्दीमुळे तेथे टिकत नसल्याची स्थिती आहे. त्याचा फायदा कर्मचारी व अधिकारी घेत होते. त्यामुळे जनतेची कामेही खोळंबत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर बीडीओ मधुकर वासनिक यांनी सोमवारी अचानक पं.स.च्या सर्व कार्यालयांना भेट दिली. गैरहजर अधिकाºयांना नोटीस देण्याचे आदेश दिले. कोणत्या विभागात किती अधिकारी, कोणता पदभार कोणाकडे आहे याची चौकशी केली. तसेच अधिकारी व कर्मचाºयांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
गत काही दिवस नरेगातील कामकाज विविध कारणांमुळे अडचणीत सापडले होते. मात्र वासनिक यांच्याकडे आलेल्या पदभारामुळे कारभार सुधारण्याची अपेक्षा आहे.दांडीबहाद्दराचे पितळ उघडेगत काही महिन्यांपासून हजेरीपटावर नुसती सही करून दौºयावर असल्याचे लिहून घरीच थांबणारे काही अधिकारी होते. सोमवारच्या अचानक झाडाझडतीमुळे गैरहजर राहणाºया अधिकाºयांचे पितळ उघडे पडले. तसेच कोणत्या अधिकाºयांकडे कोणती कामे आहेत, किती कामे झाली, याची माहिती सांगताना अधिकाºयांची धांदल उडाली. अचानक तपासणीमुळे दांडीबहाद्दर अधिकारी-कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.
गैरहजर अधिकारी व ग्रामसेवकांना नोटीसकार्यालयीन वेळेत गैरहजर असलेल्या अधिका-यांना नोटीस देण्याचे आदेश बीडीओ मधुकर वासनिक यांनी दिले. तसेच १६ व १७ पं.स मार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अनुपस्थित असलेल्या ग्रामसेवकांना देखील नोटीस देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
९ अधिकारी गैरहजरएमआरजीएसमधील ४, पंचायत विभागात २, कृषी विभागात १ तर इतर विभागातील २ यांना नोटीस दिली गेली.