प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गत अनेक वर्षापासून नगरपालिकेकडे महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. वीज बील न भरल्यामुळे महावितरणने कारवाई करत शहरातील काही भागातील सर्व पथदिव्यांची वीज खंडित केली आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे बीडकर अंधारात आहेत. मीटर रिडिंगप्रमाणे बील देण्याची मागणी नगरपालिकेने केली आहे.मागील काही दिवसांपासून बीड नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व शहरात एलईडी पथदिवे बसवण्याचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, वीज खंडित असल्यामुळे या नवीन पथदिव्यांचा काहीही उपयोग होत नाही. मागील आठवड्यापासून रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.महानगरपालिकेला प्रत्येक महिन्याला जवळपास १६ ते १८ लाख रुपये वीज बील येते. ते बील देखील न.प.कडे मागील काही महिन्यांपासून थकले आहे. तसेच अनेक वर्षांपासूनचे थकलेले बील २४ कोटी ५९ लाख रुपये आहे. बील भरण्यासंदर्भात अनेक वेळा नगरपालिकेला पत्र व नोटीस देऊन देखील कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे बीड शहरातील पथदिवे बंद करावे लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तसेच तात्काळ वीज बील भरणा केला नाही तर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.नागरिकांनी विविध कारापोटी भरलेले करोडो रुपये नगरपालिककेडे आहेत. मात्र शहरातील रस्ते, वीज, उद्याने, स्वच्छतागृहे, पाणीपुरवाठा, स्वच्छता, क्रीडांगण यासह इतर मुलभूत सुविधांकडे न.प.कडून दुर्लक्ष होत आहे. तसेच गलथान कारभारामुळे वीज बील थकले असून बीडकरांना अंधारात ठेचाळण्याची वेळ आली आहे, अशा प्रतिक्रिया संत नामदेव नगर, चक्रधर नगर, अंबीका चौक परिसरातील नागरिकांनी दिल्या. तसेच नगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करुन पथदिवे सुरु करावेत, अशी मागणी देखील नागरिकांनी यावेळी केली.
महावितरणचे बील थकल्याने बीडकर अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:45 AM
गत अनेक वर्षापासून नगरपालिकेकडे महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. वीज बील न भरल्यामुळे महावितरणने कारवाई करत शहरातील काही भागातील सर्व पथदिव्यांची वीज खंडित केली आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे बीडकर अंधारात आहेत. मीटर रिडिंगप्रमाणे बील देण्याची मागणी नगरपालिकेने केली आहे.
ठळक मुद्दे२४ कोटी ५९ लाख रुपये थकबाकी : सरासरीऐवजी मीटरप्रमाणे बील देण्याची नगरपालिकेची मागणी