लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मिरा एखंडे यांची दहाव्यांदा प्रसुती होती. त्यातच बाळ मोठे होते. प्रसुतीदरम्यान डोके बाहेर आले आणि खांदा आत अडकला. त्यामुळे बाळाचा गुदमरून मृत्यू झाला तर प्रसुतीनंतर मातेची पिशवी सैल होऊन आकुंचन न पावल्याने रक्तस्त्राव झाला आणि तिचा मृत्यू झाला, असा खुलासा डॉक्टर, परिचारीकांनी केला आहे. सोमवारी तातडीने माता मृत्यू अन्वेषण समितीने चौकशी केल्यानंतर हा खुलासा समोर आला आहे.माजलगाव ग्रामीण रूग्णालयात मिरा एखंडे यांचा दोन दिवसांपूर्वी प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला होता. यात डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच मिरा व गभातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर सोमवारी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी संबंधित डॉक्टर रूद्रवार व परिचारीकांना बीडला बोलावून घेत चौकशी केली. मातेचा मृत्यू झाल्यानंतर अन्वेषण समितीकडून चौकशी केली जाते. त्याप्रमाणे डॉ.थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सचिव डॉ.संजय कदम, डॉ.सतीष हरीदास, डॉ.राठोड, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.शहाणे, बालरोग तज्ज्ञ डॉ.पारखे यांच्या समितीने सर्वांची चौकशी केली. यामध्ये त्याने सर्व खुलासा केला.शुक्रवारी दुपारी २ वाजता मिरा या ग्रामीण रूग्णालयात दाखल झाल्या. त्यांची तपासणी करून रात्री त्यांना प्रसुतीगृहात घेतले. दहाव्यांदा प्रसुती असल्याने त्यांची प्रकृती आगोदरच चिंताजनक होती. तरीही डॉक्टरांनी त्यांची प्रसुती करण्यास सुरूवात केली. बाळ मोठे असल्याने सुरूवातीला केवळ डोके बाहेर आले. त्यामुळे खांदा आडकला आणि बाळ गुदमरून दगावले. त्यानंतर पिशवी सैल होऊन अकुंचण पावणे नैसर्गिक असते. मात्र ती आकुंचन पावली नाही. इंजेक्शनसह सर्व उपचार केले, मात्र ती न झाल्याने रक्तस्त्राव झाला. रक्तही चढविले, मात्र त्यांची प्रकृती सुधारली नाही. त्यांना बीडला हलविणेही जोखमीचे असल्याने येथेच उपचार केल्याचा खुलासा डॉक्टरांनी समितीसमोर केला. समितीने हा सर्व अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.वर्षभरात ९ मातांचा मृत्यू२०१८ या वर्षात जिल्ह्यात ९ मातांचा मृत्यू झाल्याचा आकडा आरोग्य विभागाकडे आहे. या सर्वांचा अहवाल एका निर्गमित अर्जाद्वारे वरिष्ठांना पाठविलेला आहे. त्यानंतर उपाययोजनांना गती दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मोठे बाळ, गर्भपिशवी सैल झाल्याने मातेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 11:59 PM
मिरा एखंडे यांची दहाव्यांदा प्रसुती होती. त्यातच बाळ मोठे होते. प्रसुतीदरम्यान डोके बाहेर आले आणि खांदा आत अडकला. त्यामुळे बाळाचा गुदमरून मृत्यू झाला तर प्रसुतीनंतर मातेची पिशवी सैल होऊन आकुंचन न पावल्याने रक्तस्त्राव झाला आणि तिचा मृत्यू झाला,
ठळक मुद्देमाता मृत्यू अन्वेषण समितीचे स्पष्टीकरण : डॉक्टर, परिचारिकेची चौकशी