चोऱ्यांत वाढ
सिरसाळा : शहरात गेल्या आठवड्यापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शहरात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
वाहतुकीची कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. यातच या रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
घाणीचे साम्राज्य वाढले
माजलगाव : शहरातील प्रमुख मार्गावरच न. प. च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शहरात स्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. वृक्षाचे संगोपन व संवर्धन हे निसर्गाची धूप थांबविते. वृक्ष पर्यावरणासाठी आवश्यक आहेत. यामुळे वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी आहे.