कारवाईची मागणी
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
स्वच्छतेविना दुर्गंधी
बीड : शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील नाल्यांची वेळेवर साफसफाई करण्यात येत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. धान्य गोदामाच्या जागेवर कचरा आणून टाकला जात आहे.
मोंढा रस्ता खड्ड्यांचा
बीड : शहरातील जालना रोडवरून मसरतनगर मार्गे जाणाऱ्या मोंढा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक दिवसांपासून खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे, परंतु अद्यापही हे खड्डे ‘जैसे थे’ आहेत. येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने खड्डे पडले असून ते बुजविण्याची मागणी आहे.
पथदिवे बंद
माजलगाव : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक खेड्यांमध्ये अघोषित भारनियमन सुरूच आहे. यामुळे नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात असणारे बहुतांश पथदिवे बंद स्थितीत राहतात. परिणामी भुरट्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.