शिरूर कासार : शहरातील सुतारनेटावर असलेल्या राम मंदिरात बुधवारी साध्या पध्दतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोजकीच उपस्थिती होती, कसलाही गाजावाजा न करता फक्त पंचपदी घेऊन पुष्पवृष्टी करून आरती केली. महाप्रसाददेखील कोरोनामुळे केला नाही.
पुन्हा ढगाळ वातावरण
शिरूर कासार : तालुक्यात मागच्याच आठवड्यात गारपीट व अवकाळीने त्रेधा उडवली होती. यात काही ठिकाणी पिकांची नासाडी केली होती. नंतर वातावरण बदलले होते. मात्र पुन्हा बुधवारी ढगाळ वातावरण दिसून आल्याने धडकी भरत आहे.
शिथिलतेची वेळ संपताच शटर डाऊन
शिरूर कासार : सध्या कोरोनाचा कहर सुरू असून तालुक्यात रोज बाधित रुग्ण निघत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाॅकडाऊन लागू केला. यात काही अत्यावश्यक सेवा सुरू असतात. आता त्यांनादेखील वेळेची मर्यादा घालून दिल्याने शिथिलतेची वेळ संपताच शटर डाऊन होत आहेत. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी दुकाने वेळेत बंद होत आहेत.