अंबाजोगाई : अल्पवयीन मुलीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीचा खून करून पतीने नंतर गर्भवती प्रेयसीचाही खून केला होता. चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा शिवारात हे हत्याकांड घडले होते. याप्रकरणी सोमवारी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांनी आरोपी पतीस पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आजन्म जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.येल्डा शिवारात वकिलाची डाग नामक शेतात दिलीप हनुमंत खोडवे आणि त्याची पत्नी प्रीती (वय २१) हे दोघे राहत होते. दिलीप जनावरे चारण्यासाठी दररोज शेताच्या बाजूच्या डोंगरावर जात असे.तेथे एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिली.याची कुणकुण दिलीपच्या पत्नीला लागली होती ती अडसर ठरू लागली होती. त्यामुळे दि. ४ आॅक्टोबर २०१६ रोजी रात्री दिलीपने स्वत:च्या घरात पत्नीचा गळा दबून खून केला आणि त्यानंतर शेतात लिंबाच्या झाडाखाली गर्भवती प्रेयसीचाही गळा आवळला. दोघींचा खून केल्यानंतर दिलीपने स्वत:ही विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.अल्पवयीन पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दिलीपवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात कलम पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी हरी बालाजी आणि विशाल आनंद यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेहोते.१६ साक्षीदार तपासल्यानंतर निर्णयसुनावणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांच्यासमोर झाली. १६ साक्षीदार तपासल्यानंतर न्या. पटवारी यांनी आरोपी दिलीप खोडवे यास पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरविले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.दिलीपने अल्पवयीन पीडितेचा खून केल्याचा आरोप मात्र न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी आणि फिर्यादीचे वकील अॅड. विलास लोखंडे यांनी कामकाज पहिले. त्यांना डॉ. नितीन पुजदेकर, पैरवी अधिकारी गोविंद कदम, पो.कॉ. बी.एस.सोडगीर, महिला पोलीस कर्मचारी शीतल घुगे यांची मदत झाली.
पत्नीसह गर्भवती प्रेयसीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 11:33 PM
अल्पवयीन मुलीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीचा खून करून पतीने नंतर गर्भवती प्रेयसीचाही खून केला होता. चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा शिवारात हे हत्याकांड घडले होते. याप्रकरणी सोमवारी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांनी आरोपी पतीस पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आजन्म जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देअंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : येल्डा शिवारात घडले होते हत्याकांड