बीड : गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची असा बहाणा करून सोनोग्राफी सेंटरमध्ये नेट तिच्याशी अश्लील चाळे करत जातीवाचक बोलून विनयभंग केल्याची घटना धारूरमध्ये मंगळवारी दुपारी 2 वाजता घडली. हा डॉक्टर स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरचा भाजपकडून नगराध्यक्ष आहे.
याप्रकारने राजकीय व आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. डॉ स्वरूपसिंह हजारी (वय अंदाजे ६०) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. डॉ. हजारी हा धारूर नगर पालिकेत सध्या नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरमध्येच खाजगी दवाखाना चालवतो. मंगळवारी दुपारी १९ वर्षाची गर्भवती तपासणीसाठी अली. तिला सोनोग्राफी करायची असा बहाणा दाखवत मध्ये नेले. काही वेळातच डॉक्टरने तिच्याशी लगट करत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलला. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे करीत आहेत.
डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशन कडून बंदधारुर येथील डॉक्टर असोसिएशनने हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. आज असोसिएशन च्या सर्व डॉक्टरांनी आपले वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवले असून व्यापारी असोसिएशन सुद्धा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन गुन्हा तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.