बीड: गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. मात्र, भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले असून, पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच त्यांचा गुण मला जास्त आवडतो, असे म्हटले आहे. तसेच अतिशय भ्रष्ट असणाऱ्या या राष्ट्रवादीच्या विळख्यातून, आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ, असे आवाहन प्रीतम मुंडे यांनी केले आहे. (bjp pritam munde said i like pm modi quality of not holding any press conference at the most)
“असदुद्दीन ओवेसींना अजिबात घाबरत नाही, तेलंगणध्ये सत्तेत आल्यावर...”: अमित शहांचे टीकास्त्र
पंतप्रधान मोदीजींचा आजवरचा सगळ्या आवडता माझा गुण म्हणजे गेल्या ७ वर्षांत त्यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकार परिषद घेतली नाही, याविषयी त्यांच्यावर टीका देखील होते. पण जो माणूस आपले काम, आपले ध्येय स्पष्ट समोर असताना काम करत राहतो, आपल्या मार्गावरती मार्गक्रमण करत राहतो. त्यावेळी त्याच्याबद्दल चांगले बोलणारे जर १० लोकं असतील तर टीका करणारेही दोन लोकं असतात. पण त्या टीकेने विचलीत न होता, आपण आपले काम करत राहणे महत्त्वाचे असते, असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे यांनी बीड राष्ट्रवादीच्या नेत्यांसह ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
“CM उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामागे वेगळाच डाव!”; नितेश राणेंचा अजब तर्क
बीड जिल्ह्याला राष्ट्रवादी मुक्तीकडे नेऊ
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आवाहन करू इच्छिते की, अतिशय भ्रष्ट असणाऱ्या या राष्ट्रवादीच्या विळख्यातून आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ. कोण रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करत आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. उगीचच कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरायचे आणि आपणच काम केल्याचा आव आणायचा. याचा एक नवीन प्रयोग जिल्ह्यात सुरू झाला आहे. बातम्या काढतात, या नॅशनल हायवेचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न. मात्र जो रस्ता यांच्या अधीपत्त्यात येत नाही त्या रस्त्याच्या बातम्या येतात. याउलट श्रेय घेणारे आमदार भाजपचे असते तर मी समजून घेतले असते, असा टोला धनंजय मुंडे यांचे नाव न घेता प्रीतम मुंडे यांनी लगावला.
“म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘भावी सहकारी’ असा शब्दप्रयोग केला”: संजय राऊत
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रस्त्यावर खड्डे पडले की म्हणतात खासदारांना विचारा आणि दुरुस्तीचा निधी आला की म्हणतात आम्ही आणला. अशा दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांना, जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका प्रीतम मुंडे यांनी केली आहे.