बीड : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला. हिंसाचारात अकरा कार्यकर्त्यांचे बळी गेले. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचाराचा निषेध प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण राज्यभर करण्यात आला. बीड येथे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगर रोड येथील संघर्ष योद्धा जनसंपर्क कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात राम कुलकर्णी, अजय सवाई, सचिन उबाळे , नागेश पवार,विलास बामणे, भूषण पवार, बालाजी पवार,प्रमोद रामदासी,नरेश पवार, विजय गायकवाड, अनिल चांदणे,कपिल सौदा,शरद बडगे,पंकज धांडे,महेश सावंत, संभाजी सुर्वे, कल्याण पवार आदी सहभागी होते. माजलगावात निषेध आंदोलनात भाजपाचे तालुका अध्यक्ष अरूण राऊत, डॉ.अशोक तिडके, डॉ. प्रशांत पाटील,बबनराव सिरसट,डॉ.भगवान सरवदे,दत्ता महाजन, रामराव जाधव,सोमेश दहिवाळ,बाळासाहेब क्षीरसागर,कोरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आष्टी येथे आ.सुरेश धस यांनी कोरोना नियमावलीनुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तहसीलदार राजाभाऊ कदम यांना निवेदन दिले. धारूर येथे नगराध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन दिले. गेवराईत आमदार लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार इटेकर यांना निवेदन दिले.
अंबाजोगाईत आ.नमिता मुंदडा यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन केले. अक्षय मुंदडा,अमोल पवार,श्रीहरी डांगे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते सहभागी होते.