शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

बीड जिल्हा परिषदेत भाजपा आघाडीला धक्का; राष्ट्रवादीचे 6 बंडखोर सदस्य अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 11:28 PM

बीड जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आघाडीला जबरदस्त धक्का बसला असून, सत्ता स्थापनेत पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा बंडखोर सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरले आहेत.

सतीश जोशीबीड : बीड जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आघाडीला जबरदस्त धक्का बसला असून, सत्ता स्थापनेत पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा बंडखोर सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरले आहेत. यामुळे पुन्हा एकदा बीड जि.प.च्या राजकारणात खळबळ माजली आहे. या सहा सदस्यांत माजी मंत्री सुरेश धस यांच्या गटाचे ५, तर आ. जयदत्त क्षीरसागर गटाच्या एका सदस्याचा समावेश आाहे.अपात्र ठरलेल्या या सहा सदस्यांमध्ये शिवाजी एकनाथ पवार, (रा. झापेवाडी, ता. शिरूर), प्रकाश विठ्ठल कवठेकर (रा. उखंडा, ता. पाटोदा), अश्विनी ज्ञानेश्वर जरांगे (रा. कुसळंब, ता. पाटोदा), संगीता रामहरी महारनोर (रा. दादेगाव, ता. आष्टी), मंगल गणपत डोईफोडे (रा. ईट पिंपळनेर, ता. बीड), अश्विनी अमर निंबाळकर (रा. आष्टा हरिनारायण, ता. आष्टी) यांचा समावेश आहे.बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६० पैकी सर्वाधिक २५ जागा राष्ट्रवादीने, तर त्याखालोखाल १९ जागा भाजपने जिंकल्या होत्या. शिवसेना आणि शिवसंग्रामने प्रत्येकी ४, काकू-नाना आघाडी-३ अपक्ष २ तर काँग्रेसने ३ जागा जिंकल्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीत राजकीय घडामोडी वेगाने होत राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्या गटाचे ५ आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा १ अशा सहा जणांनी बंडखोरी करीत भाजपला साथ दिली. यापैकी धस गटाच्या पाच जणांनी भाजप आघाडीला मतदान केले, तर क्षीरसागर गटाच्या मंगल डोईफोडे या आजारी असल्याचे कारण दाखवीत सभागृहात अनुपस्थित राहिल्या.शिवसेना आणि शिवसंग्रामचे प्रत्येकी ४, काँग्रेस १, राष्ट्रवादीचे बंडखोरीचे ५ यांना साथीला घेत भाजपने ३४ विरुद्ध २५ अशा फरकाने सत्ता काबीज केली होती. जि.प. अध्यक्षपदासाठी भाजपच्या सविता विजय गोल्हार यांनी मंगला प्रकाश सोळंके यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसंग्रामच्या जयश्री राजेंद्र मस्के यांनी शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांचा पराभव केला होता. या निकालाविरुद्ध पक्षांतर विरोधी कायद्याचा भंग केला म्हणून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे, पराभूत उमेदवार मंगला सोळंके आणि अजय मुंडे यांनी या सहा जणांविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करीत या सर्वांना अपात्र घोषित करावे, अशी याचिका दाखल केली होती. अखेर सुनावणीनंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी १६ आॅक्टोबर रोजी ही याचिका निकाली काढीत या सर्वांना अपात्र ठरविले आहे.

टॅग्स :BJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडे