अंबाजोगाईत भाजपचे नशीब उजळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:05 AM2019-05-15T00:05:17+5:302019-05-15T00:06:48+5:30

येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा पेच आठवडाभरापासून सुटत नव्हता. अखेर मंगळवारी दुपारी भाजपा, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या २२ नगर सेवकांनी एकत्र येऊन प्रत्येक पक्षाला नऊ-नऊ महिने उपाध्यक्ष पद वाटून घेतले.

BJP's luck in Ambajogai | अंबाजोगाईत भाजपचे नशीब उजळले

अंबाजोगाईत भाजपचे नशीब उजळले

Next
ठळक मुद्देउपनगराध्यक्षाचा पेच सुटला : भाजपा, काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसने कालखंड वाटून घेतले

अंबाजोगाई : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा पेच आठवडाभरापासून सुटत नव्हता. अखेर मंगळवारी दुपारी भाजपा, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या २२ नगर सेवकांनी एकत्र येऊन प्रत्येक पक्षाला नऊ-नऊ महिने उपाध्यक्ष पद वाटून घेतले. प्रथम उपाध्यक्ष पद कोणाला याच्या चिठ्ठ्या टाकल्या असता सहा नगरसेवक असतानाही चिठ्ठीतून भाजपचे नशीब उजळले. बुधवारी उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर होणार आहे.
उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्यावर स्वपक्ष राष्ट्रवादी, भाजप आणि कॉँग्रेस पक्षाच्या २२ नगर सेवकांनी एकत्र येऊन ७ मे रोजी अविश्वासाचा ठराव दाखल केला. तो बहुमताने मंजूरही झाला. मात्र आता उपाध्यक्षपद कोणाला यासाठी तिन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु झाली. आठवडाभर हा तिढा सुटत नव्हता. मंगळवारी दुपारी २२ नगर सेवकांनी एकत्र येत उर्वरित प्रत्येकी नऊ महिने एका पक्षाला असे तीन वेळा उपाध्यक्ष पद वाटून घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा उपाध्यक्षपद कोणाला याचा पेच सोडवण्यासाठी तिन्ही पक्षाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यात पहिली चिट्ठी भाजपची निघाली. तर दुसरी राष्ट्रवादी आणि तिसरी टर्म कॉंग्रेस पक्षाकडे राहिली. अशा पद्धतीने उप नगराध्यक्ष पद वाटून घेण्याचा अलिखित ठराव झाला. मुंदडा गट मात्र या सर्व प्रक्रि येपासून तटस्थ आहे. नगर परिषदेच्या निवडणूकीत १६ नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले. या नगरसेवकात मुंदडा व साठे असे दोन गट झाले. साठेकडे नऊ तर मुंदडा गटाकडे सहा, कॉंग्रेस पक्षाचे ७ व भाजपचे ६ असे सध्याचे पक्षीय बलाबल आहे. गटबाजीच्या राजकारणामुळे पक्षाची ताकद मोठी असतानाही राकाँमध्ये दोन गट पडले. सर्वात कमी संख्याबळ असतानाही चिठ्ठीत मात्र भाजपचे नशीब उजळले.
भाजपमध्ये सहापैकी पाच इच्छुक
भाजपचे अंबाजोगाई नगर पालिकेत सहा सदस्य आहेत. त्यापैकी पाच सदस्य उपाध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत.
यात डॉ. अतुल देशपांडे, सुरेश कराड, सविता अनंत लोमटे, शिल्पा संजय गंभिरे आणि संगीता दिलीप काळे हे पाचही सदस्य उपनगराध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. हा निर्णय आता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सोपवण्यात आला आहे.
बुधवारी प्रक्रि या सुरू
उपनगराध्यक्ष पदासाठी निर्माण झालेला पेच आठवड्यानंतर सुटला आहे. आता उपाध्यक्ष निवडीची अधिकृत प्रक्रि या बुधवारी जाहीर होणार आहे.
न. प. च्या वतीने उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी सर्वसाधारण सभेची सूचना किमान पाच दिवस अगोदर सर्व सदस्यांना उपलब्ध होणे बंधनकारक असते.

Web Title: BJP's luck in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.