अंबाजोगाई ( बीड ) : बुधवारी रात्रीनंतर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशीरा वाघाळा (ता. अंबाजोगाई) येथील तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले. या अपघातात त्या तरुणाचा मृत्यू झाला. तर, गुरुवारी सकाळी होळ (ता. केज) येथे रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत धारूर तालुक्यातील तरुण ठार झाला. ( Black night! Two young men were killed on the spot in two separate accidents near Ambajogai )
निकेतन दिलीप हजारे (वय ३०) असे वाघाळा येथील अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. निकेतन मोबाईल टॉवरच्या कामावर लेबरचे काम करत असे. बुधवारी रात्री उशीर १२.४५ वाजताच्या सुमारास तो एकाला भेटण्यासाठी वाघाळा येथून सेलू अंबा टोलनाक्याकडे पायी निघाला होता. यावेळी त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात निकेतनचा जागीच मृत्यू झाला. मयत निकेतनच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा - मोठ्या शिताफीने पकडलेल्या दरोडेखोराचे काही तासातच पोलीस ठाण्यातून पलायन
दुसरा अपघात गुरुवारी (दि.०२) सकाळी होळजवळ झाला. कारी (ता. धारूर) येथील संतोष रामभाऊ मुजमुले (वय २७) हा तरुण होळ येथे मावशीकडे आला होता. सकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला बसला असताना त्याला रुग्णवाहिकेने धडक दिली. या अपघातात जबर जखमी झालेल्या संतोषचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.