धारूर : दारूड्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला. मुलगी गर्भवती राहिल्यावर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बापाला अटक करण्यात आली आहे.
धारूर तालुक्यातील एका गावातील ऊसतोड मजूर असलेला ४० वर्षीय बाप हा दारूडा आहे. त्याने आपल्या १४ वर्षांच्या मुलीवर नशेत वारंवार अत्याचार केला. पीडितेच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिने अंबाजोगाईच्या रुग्णालयात तपासणी केली. त्यानंतर ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपल्या बापानेच अत्याचार केल्याचे सांगितले. पीडितेच्या फिर्यादीवरून धारूर पोलिस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शेळके हे करत आहेत.