अंबाजोगाई : राज्यामध्ये उपलब्ध असलेला रक्तसाठा अतिशय कमी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जनतेला स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. त्याला प्रतिसाद देत राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने ५ एप्रिल रोजी आयोजित शिबिरात २३ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
शिबिर उदघाटनप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक धम्मपाल सरवदे, नगरसेवक सुनील व्यवहारे,राणा चव्हाण,महेबूब गवळी,जावेद गवळी, विजय रापतवार, अजीमभाई आदींची उपस्थिती होती.
शिबिरात काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक सुनील व्यवहारे,रफीक गवळी,महेश वेदपाठक,मेहबूब गवळी,अहमद हुसेन गवळी,शाहरूख अली,यश नगराळे, शेख अजीम अब्दुल, संदीप दरवेशवार, मोहम्मद साबेर,मजहर इब्राहिम गवळी,अजीम जरगर,संघपाल चिमणे,बालाजी हिरवे, अशोक आडे,रमेश आडे,भाऊराव गवळी, शकील हसन गवळी, सतीश सोनटक्के,उमेश कांबळे,विठ्ठल माळी,सुभाष चोपडे आदींनी रक्तदान करून सहभाग घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. शीला गायकवाड, डॉ. विनय नाळपे,डॉ.मंजुषा देशमुख,जगदीश रामदासी,शशिकांत पारखे,रमेश इंगळे,बाबा शेख यांचे सहकार्य लाभले. शिबिरानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले.
आतापर्यंत ८४० जणांचे रक्तदान
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालय रक्तपेढी विभाग यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे टप्याटप्याने रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. काँग्रेस पक्षाने संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत आतापर्यंत राबविलेल्या या उपक्रमात ८४० जणांनी रक्तदान केले. यात १५० महिला भगिनींनी देखील रक्तदान केल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले.
===Photopath===
060421\06bed_10_06042021_14.jpg