शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आ.संजय दौंड, प्रतिष्ठानचे केंद्राध्यक्ष अनिकेत लोहिया, सचिव डॉ.नरेंद्र काळे, पृथ्वीराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, बालाजी शेरेकर आदी उपस्थित होते.
१ मेपासून १८ ते २४ वयोगटांतील तरुणांना मोफत लसीकरणाची मोहीम राज्य सरकारने सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर लसीकरण केल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्यामुळे, राज्यांमध्ये पुढील काही महिने रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणू शकतो. यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुढाकाराने सोमवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी स्वेच्छा रक्तदानासाठी नोंदणी केलेल्या उर्वरित दात्यांसाठी पंधरा दिवसांत आणखी एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल, असे डॉ.नरेंद्र काळे यांनी सांगितले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद टेकाळे, रणजीत मोरे, कृष्णा सापते, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष प्रियंका गित्ते, प्रशांत पवार, कृष्णा मुदगुलकर, योगेश शिंदे, शुभम नरके, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा.प्रताप जाधव, प्रा. इंद्रजीत भगत, प्रा.रोहित पाटील यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
030521\avinash mudegaonkar_img-20210503-wa0018_14.jpg