गेवराई : येथील कोरोना रुग्णसेवा समितीच्या वतीने शुक्रवारी आयोजित शिबिरात ४२ दात्यांनी रक्तदान केले. यात महिलांनीही सहभाग घेतला. समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी सिंधी भवन येथे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, अजित देशमुख, जाधव, अभिजित पंडित, डॉ. कुचेरीया, आदींनी भेटी देत या समितीच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
दरम्यान, यावेळी कोविडबाबतच्या सर्व नियमांचे पालन करीत टप्प्याटप्प्याने ५-५ रक्तदात्यांना वेळेवर बोलावून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संजय काळे, ॲड. सुभाष निकम, प्रा. राजेंद्र बरकसे, बाळासाहेब सानप, राजेंद्र आतकरे, डॉ. अनिल दाभाडे, श्रीनिवास बेदरे, बबलू खराडे, अमोल वैद्य, केशव पंडित, शेख रईस, प्रा. शरद सदाफुले, प्रताप खरात, शिरीष भोसले, सुरेंद्र रूकर, दादासाहेब घोडके, उत्तम सोलाने, संदीप मुळे, ॲड. कल्याण काळे, प्रशांत घोटणकर, अभिजित काला, रंजित सराटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. व्ही. चिंचोले, जिल्हा रुग्णालयाचे रक्तपेढी विभागाच्या संचालिका डॉ. जयश्री बांगर, \जनसंपर्क अधिकारी ए. एच. केकान, रोटे तंत्रज्ञ जी. डी , सोळंके एन. पी. मस्के, सय्यद हे उपस्थित होते.\
===Photopath===
300421\1510sakharam shinde_img-20210430-wa0027_14.jpg