शिरूर कासार : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील समर्थनाथ गणेश मंडळाने अवांतर आणि खर्चिक उपक्रम टाळून सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश गाडेकर यांच्या पुढाकारातून आयोजित रक्तदान शिबिरात ४२ गणेशभक्तांनी सहभाग घेतला. पुरूषांबरोबरच महिलांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तपेढीचे तंत्रज्ञ आर. एस. खेडकर, बिभीषण मात्रे, रक्त संकलन सहाय्यक नरसिंग कोकंडे, चालक उत्तम राऊत यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून जे नागरिक वंचित राहिले आहेत, अशा नागरिकांसाठी मंडळाच्या सहकार्याने लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. लसीकरण करण्यासाठी डॉ. विकास कंठाळे, डॉ. सुषमा सानप, डॉ. संध्या लाटे, ब्रदर संतोष गवांडे, परिचर आप्पासाहेब नेमाने, परिचारिका संगीता काजळे यांच्यासह बालासाहेब कराड, लखुळ मुळे यांनी सहकार्य केले. शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून रांगोळी, चित्रकला, लिंबू-चमचा, संगीत खुर्ची अशा स्पर्धाही घेण्यात आल्या.
170921\img-20210917-wa0016.jpg
फोटो