गेवराई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने आ. लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा फुले शाॅपिंग सेंटर येथे रविवारी रक्तदान शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केले. यावेळी तहसीलदार सचिन खाडे यांनीदेखील रक्तदानात सहभाग घेतला.
या रक्तदान शिबिराला तहसीलदार सचिन खाडे, राजेश शिंदे, पोलीस निरीक्षक रवींद्र पेलगुरवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, जि.प. सदस्य पांडुरंग थडके, दीपक सुरवसे, दादासाहेब गिरी, राजेंद्र भंडारी, भगवान घुबार्डे, संजय जाधव, प्रा. श्याम कुड, जानमहंमद बागवान, मधुकर तौर आदी उपस्थित होते. रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवरसुद्धा मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. तसेच कोरोनाचा सामना करत असताना सर्वसामान्य माणसाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही तर कोरोनासाठी अत्यंत आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनबरोबरच रक्ताचासुद्धा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित करून प्रत्येकाने सामाजिक बांधीलकी जोपासत रक्तदान करणे आवश्यक असल्याने हे शिबिर आयोजित केले होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी संजय इंगळे, मुन्ना मोजम, अप्पासाहेब कानगुडे, कृष्णा काकडे, उद्धव मडके, दशरथ पंडित, राम पवार यासह अनेक जण उपस्थित होते.
===Photopath===
030521\sakharam shinde_img-20210503-wa0020_14.jpg