तालुक्यातील देवळा येथे संत तुकाराम महाराज बीज युवा कीर्तन महोत्सव व मानवलोक वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिबिरात ११ दात्यांनी रक्तदान केले.
देवळा येथील श्रमकरी ग्रूप , देवळा ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज बीज युवा कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. बीज ही आध्यात्मिक न ठेवता या उत्सवात सामाजिक हिताचे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. या मध्ये मोफत आरोग्य शिबीर, गोळ्या ओषधी आणि रक्ततपासणी, रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध प्रकारच्या स्पर्धा , शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र यांचे मार्गदर्शन,आरोग्य विषयी जनजागृती व मार्गदर्शनाचे आयोजन केले जाते. तर गाव स्वच्छता अभियान राबवून धुळवड साजरी केली जाते. तसेच कीर्तनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून संतांनी सांगितलेल्या उपदेशातून समाजप्रबोधन केले जाते. तसेच येथे दररोज दोन वेळा गरजूंना अन्नदानही सुरू आहे.
या वर्षी कोरोना स्थिती आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचे आदेश दिल्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्यामुळे रक्तदान आणि साध्या पध्दतीने बीज साजरी करण्यात आली.
या वेळीरावसाहेब यादव ,प्रभाकर सगट, नानासाहेब शेळके, बालासाहेब खामकर आदी उपस्थित होते तर देवळा श्रमकरी फाऊंडेशनने शिबिराचे नियोजन केले होते.
===Photopath===
310321\avinash mudegaonkar_img-20210331-wa0084_14.jpg