शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

दफनविधीसाठी जागा नसल्याने महामार्गावर ठेवला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:15 PM

वडार समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला 

ठळक मुद्देगेवराई तालुक्यातील नवीन नागझरी येथील प्रकार  प्रशासनाने तात्काळ उपलब्ध करून दिली गायरान जमिनीची जागा

गेवराई (जि. बीड) : तालुक्यातील नवीन नागझरी येथे वडार समाजासाठी स्मशानभूमी नसल्याने एका तरुणीच्या मृत्यूनंतर तिचा दफनविधी कुठे करायचा, असा प्रश्न करीत नातेवाईकांनी शुक्र  वारी मृतदेह धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठेवून २० मिनिटे ठिय्या मांडला. त्यानंतर पोलीस व महसूलच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत समाजाला दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून दिली.

येथील मनिषा अनिल शिंदे (२०) नामक तरूणीचा आजाराने गुरूवारी रात्री ९ वाजता मृत्यू झाला. गावात वडार समाजाच्या दफनविधीसाठी जागा नसल्याने शुक्रवारी सकाळी संतप्त नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्गावर मृतदेह आणून ठिय्या दिला. माहिती मिळताच पोउनि. विठ्ठल शिंदे व नायब तहसिलदार प्रल्हाद लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जागा मिळेपर्यंत मृतदेह  उचलणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. अखेर प्रशासनाने गायरान जमीन गट नंबर ३८ मधील एक एकर जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्या परिसरात दुपारी दीड वाजता दफनविधी करण्यात आला.

नागझरी येथे ४० वर्षांपासून वास्तव्यगेवराई तालुक्यातील नागझरी येथे गेल्या ४० वर्षांपासून वडार समाजातील अनेक कुटुंबे वास्तव्य करून राहतात. यातील काही कुटुंबांकडे स्वत:ची शेती आहे. तर अनेकांकडे शेती नाही. रोजमजुरीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.ज्यांच्याकडे शेत आहे, ते लोक शेतात आतापर्यंत दफनविधी करीत आले आहेत. व ज्यांना पर्याय नाही अशी कुटुंबे रस्त्याच्या कडेला दफनविधी करतात. या समाजाला स्मशानभूमीसाठी जागा द्यावी, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली होती.

शुक्रवारी तरुणीच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्र मक झाले होते. पोलीस व महसूलच्या अधिकाऱ्यांनी समजूत घालत तात्काळ मार्ग काढल्याने हा प्रश्न सुटला व दफनविधी करण्यात आला.         -विठ्ठल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गेवराई  

तालुक्यात विविध जाती, धर्म समुदायासाठी अंत्यविधी व दफनविधीच्या जागेचे १० ते १५ अर्ज आलेले असतील. त्यांना तात्काळ जागा देण्यात येईल. असे प्रसंग पुन्हा होणार नाहीत.प्रल्हाद लोखंडे, नायब तहसीलदार 

टॅग्स :highwayमहामार्गBeedबीडDeathमृत्यू