बीड : पेठ बीड भागात मागील काही महिन्यांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ डिसेंबर रोजी केली.
समीरखान जहांगीरखान पठाण (रा.महंमदिया कॉलनी बीड), शेख कलीम शेख अलीम (हुसेनियॉ कॉलनी, बीड) असे ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींचे नावं आहेत. यातील आरोपी हे तेलगाव नाका परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी छापा मारून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्याने साथीदारासोबत मिळून घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यांना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोनि भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय गोसावी, प्रसाद कदम, सोमनाथ गायकावाड, रामदास तंदळे, सखाराम पवार, मनोज वाघ, असीफ शेख, नसीर शेख, तुळशीराम जगताप, विकास वाघमारे यांनी केली.