अंबाजोगाई: अंबाजोगाई- मोरफळी ही बस मंगळवारी दुपारी २ वाजता बुट्टेनाथ घाटात उलटली. या अपघातात २५ ते ३० जन जखमी झाले आहेत. चालकाने प्रसंगावधान राखत जागेवर वळत घेत बस दरीत कोसळण्यापासून वाचाव्ल्याने पुढील अनर्थ टळला. जखमींना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगारातून अंबाजोगाई- मोरफळी (एम. एच.२०-३२०)ही बस अंबाजोगाई येथून येल्डा मार्गे मोरफळी कडे निघाली होती. बस शहरापासून पाच कि. मी. अंतरावर असलेल्या बुट्टेनाथ घाटात उतारावर बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस पलटी झाली. या बस मध्ये ६० ते ७० प्रवाशी प्रवास करत होते. अपघातात २५ जन जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ब्रेक फेल झाल्यामुळे प्रसंगावधान राखून चालकाने जाग्यावरच वळण घेत बस दरीत कोसळण्यापासून वाचवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस महसूल प्रशासनाच्या वतीने निरीक्षक विनोद घोळवे, नायब तहसीलदार गणेश सरोदे व पुरवठा अधिकारी मिलिंद गायकवाड, यांच्यासह अनेकांनी धाव घेतली.